वंचित विकासतर्फे शनिवारी  ‘मनात रुजलेली गाणी’ संगीत मैफल

वंचित विकासतर्फे शनिवारी  ‘मनात रुजलेली गाणी’ संगीत मैफल

 
 
पुणे, दि. २१ – वंचित विकास संस्थेतर्फे ‘मनात रुजलेली गाणी’, या संगीत मैफलीचे येत्या शनिवारी (ता. २२) सायंकाळी ५ वाजता लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता पुणे येथे आयोजन   (  The music concert ‘Songs rooted in the heart’ will be organized by Vanchit Vikas Sanstha on Saturday (22) at 5 pm at Lady Ramabai Hall, S. P. College, Tilak Road, Pune.) करण्यात आले आहे. संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि रसिक श्रोत्यानी एकत्र येऊन संस्थेविषयी अधिक जाणून घ्यावे, एकमेकांशी जोडले जावे, यासाठी ही मैफल आयोजित केली आहे. यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे, अरुण दाते, आशा भोसले, सुमन कल्याणपूर आदी गायकांनी, तर पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, वसंत प्रभू अशा प्रसिद्ध संगीतकारांनी अजरामर केलेली, मनात खोलवर रुजलेली गाणी या मैफलीत श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. मराठी गीतांच्या विश्वासातील हा रम्य प्रवास सुधांशु नाईक, आरती परांजपे, चैत्राली अभ्यंकर उलगडणार आहेत, असे कार्यवाह संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी सांगितले.
 
समाजातील विविध स्तरातील घटकांना स्वाभिमानी व उत्तम आयुष्य जगता यावे, यासाठी धडपडणाऱ्या विलास चाफेकर यांनी वंचित विकास संस्थेची स्थापना  (Vilas Chaphekar, who strives to enable people from different strata of society to live a self-respecting and better life, founded the Vanchit Vikas Sanstha. ) केली. त्यातून अनेक लोकोपयोगी प्रकल्प उभे राहिले. आदिवासी, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिक, देहविक्रय जाणाऱ्या महिला, त्यांची मुले, आरोग्य विषयक समस्या अशा अनेक आघाड्यावर ही संस्था काम करते. लहान मुलांसाठी ‘निर्मळ रानवारा’ मासिक, मुलांसाठी ‘निहार’सारखे निवासी संकुल आदी प्रकल्प उल्लेखनीय आहेत, असे कुर्लेकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *