वनाझ परिवार विद्या मंदिर, कोथरूड पुणे या शाळेत यावर्षी नवरात्रात ‘ नवरंग कीर्तीचे’ हा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. वनाझ परिवार विद्या मंदिर नेहमीच सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमशील शाळा म्हणून कोथरूड विभागात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सादरीकरण आॅनलाईन पध्दतीने सुरूच होते तसेच पालक व विद्यार्थीचा यामधील सहभाग नेहमीच उत्स्फूर्त होता आणि असतोच. ‘ नवरंग किर्तीचे’ या उपक्रमात इयत्ता १ली ते ५वी च्या विद्यार्थ्यांनी २०२१ मध्ये मा. पंतप्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने पुरस्कृत केलेल्या विविध क्षेत्रातील १८ वर्षाखालील मुलांची कामगिरी अतिशय सुंदर पध्दतीने सांगण्यात आली. नवरात्रीतील दहा दिवसामध्ये दररोज एक याप्रमाणे देवीचे एक स्वरूप व बाल शौर्य पुरस्कार विजेता यांच्या कार्याची सांगड घालत कीर्तीचे नवरंग उपक्रम सादर करण्यात आले. यामध्ये कु. आर्शिया दास( बुध्दिबळ पटु) खुशी पटेल (स्केटिंग) सविता कुमारी (नेमबाजी) पलक शर्मा (जलतरणपटू) सोनित सिसोळेकर(शैक्षणिक संशोधन) अनुराग रमोला(कलाक्षेत्र) कामेश्वर वाघमारे (शौर्य) प्रसिद्धी सिंग (समाजकारण) काम्या कर्तिकेयन ( गिर्यारोहक) अर्चित पाटील (नवनिर्माण क्षेत्र) या दहा मुलांचे कर्तुत्व कथन करताना विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारे उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तसेच कुणी पिसाळलेल्या बैलाला सामोरे जात दुसऱ्याचे प्राण वाचवले तर कुणी धनुष्य बाणाचा अचुक नेम साधला असे एकापेक्षा एक कल्पक, हुशार कलाकार, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळविली. कमी वयात स्वतः चे व देशाचे नाव उज्ज्वल करणारी ही लहान मुले म्हणजे इतरांसाठी मोठी प्रेरणास्रोत आहेत. शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले, तसेच पालक, वाचक, श्रोते यांचा उत्तम प्रतिसाद या उपक्रमात मिळाला. Vanaz parivar prathmik vibhag या आमच्या शाळेच्या YouTube चॅनेलवर या उपक्रमातील सर्व व्हिडिओज आपणास पहावयास मिळतील. सर्वांनी या चॅनेल ला भेट देऊन Subscribe व Like करून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे.असे आवाहन वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड यांच्यामार्फत करण्यात आले.