पुणे : प्राचार्य डॉ . शिवाजीराव मोहिते यांच्या ७५ व्या अमृत मोहोत्सवानिमित्त गौरव समिती संपादित आणि अनुबंध प्रकाशन प्रकाशित ‘संसाहित्यातील मूल्यविचार‘ या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी, दि . १७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता टिळक रोड वरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळा निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ . सदानंद मोरे, ह. भ. प . चैतन्य महाराज देगलूरकर, महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या उपस्थित होणार आहे . तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीपराव मोहिते पाटील आणि तसेच प्राचार्य डॉ . शिवाजीराव मोहिते अमृतमोहोत्सव समितीचे सदस्य श्रीकांत चौगुले , माधव राजगुरू या प्रसंगी उपस्थित राहणार आहे.
वारकरी साहित्यातील सांस्कृतिक संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत निळोबाराय यांच्यापर्यंत महाराष्ट्राला जवळपास चार-पाच शतकांची संतांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे व ‘सकल स्त्री संतगाथा’चे संपादन करून संतसाहित्यात मोलाची भर घालून याच निमित्ताने डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी गौरव ग्रंथ मांडण्याचा विचार केला. सर्वांत महत्त्वाचे यातून आपल्याला संतपरंपरेत स्त्री संतांचीही परंपरा पाहावयास मिळणार आहे.