पुणे : कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने बालेवाडी येथील क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजिलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेचे अजिंक्यपद उझबेकिस्तानने पटकावले. इराणचा संघ उपविजेता ठरला. कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पॅट्रोन आणि स्पर्धेच्या प्रमुख संयोजक ॲड. स्मिताताई निकम यांच्या पुढाकारातून वनकीज इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. सिक्युरिटी पार्टनर म्हणून ‘ओके सर सिक्युरिटी’ने काम पाहिले.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पोपली, चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर, इंटरनॅशनल कुराश असोसिएशनचे अध्यक्ष हैदर फर्मान, सचिव नसेरी रॉय जियाउद्दीन, महासचिव लालसिंग राजन, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, टेक्निकल चेअरमन रवींद्र दय्या, कुराश महाराष्ट्राचे अंकुश नागरे, सचिव संजय धोपावकर, कुराश पुणेचे अध्यक्ष संतोष चोरमुले, विष्णू पाटोळे, भारत कुस्ती संघाचे सचिव हरिश्चंद्र कदम, उपसंचालक सुहास पाटील, महाराष्ट्र कुस्ती संघाचे सचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.