पुणे, दि. ९- उमेद फाउंडेशनतर्फे (umed foundeshion) दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठीच्या बालक-पालक प्रकल्पाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कुल, टिळक रोड येथे या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यंदाचा पुरस्कार डॉ. रितेश व उल्का नेहेते (पुणे), चिंतामणी व राजेश्वरी राशीनकर (पुणे), अभिमन्यू पोटे (कोल्हापूर), अमृता भिडे (रत्नागिरी) यांना जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी (Founder of Snehalaya Sanstha Dr. Girish Kulkarni ) असणार आहेत. पुणे महानगराचे सरसंघचालक रविंद्र वंजारवाडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. प्रतिभाताई केंजळे, जयंतराव पारखी, सीमा दाबके यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश सणस (Rakesh Sanas, President of Umed Foundation ) यांनी दिली.