पुणे, दि. २६ – ‘केवळ शिक्षण नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवूया’ या उद्दिष्टाने प्रेरित त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनतर्फे मुळशी तालुक्यातील लवळे येथील महात्मा फुले विद्यालयात ‘संखारा व्यक्तिमत्व विकास व वर्तणूक प्रशिक्षण’ हा तीन दिवसीय विशेष उपक्रम राबविण्यात आला. (Trisharan Enlightenment Foundation organized a three-day special program ‘Sankhara Personality Development and Behavior Training’ at Mahatma Phule Vidyalaya in Lavale, Mulshi Taluka.)संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आत्मभान, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व समजावून देण्यात आले. फाउंडेशनचे राज्य व्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी शैलीत विविध सत्रांमधून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थी अंतर्मुख झाले. अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व शाळांमध्ये दिले गेले पाहिजे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाली असून, असे प्रशिक्षण काळाची गरज आहे. यातून आम्हाला आमचे खरे सामर्थ्य कळाले, अशा भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
“या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ वर्तणूक सुधारली नाही, तर त्यांनी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. भविष्यातही अशा स्वरुपाचे प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येतील. हे केवळ तीन दिवसांचे शिबिर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करणारी जीवनदृष्टी होती,” असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे.
त्रिशरण फाउंडेशनच्या टीमचे संघटित आणि निःस्वार्थ कार्य या यशामागे दडलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय वयापासूनच अशा प्रकारचे उपक्रम शाळांमधून राबविणे महत्वाचे आहे. त्यातून त्यांना पाठ्यक्रमाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे ज्ञान मिळते. त्यांची जडणघडण योग्यरीत्या होण्यास मदत मिळते, असे प्रज्ञा (pradnya waghmare) वाघमारे यांनी नमूद केले.