ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्चला ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन

ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्चला ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन

ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्चला
‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन
 

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (NAAC-नॅक) समितीद्वारे करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाला ३.३१ गुणांसह ‘ए प्लस’ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत औटी यांनी दिली. ‘नॅक’च्या निकषांमध्ये महाविद्यालयाची संशोधनातील कामगिरी, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम याचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरला.

 
सलग तीन वर्ष उत्कृष्ट प्लेसमेंट, प्रवेशातील सातत्य, प्रत्येक वर्षी किमान १० पेटंट (संशोधन), टाइम्स इंजिनिअरिंग सर्व्हेमध्ये तीन ते चार वर्षांपासून प्रत्येक वर्षी येणारे मानांकन, तसेच सीडॅक, आयबीएम, सॅप, ड्रोन आणि भारतीय कौशल्य विकास परिषद या सर्वांसोबत असलेल्या सहयोगाच्या माध्यमातून व वेगवेगळ्या कंपनीच्या साथीने विद्यार्थ्यांना वेगवेगेळे अभ्यासक्रम व मार्गदर्शन याचाही यामध्ये मोठा हातभार राहिला.

महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमाचे, तसेच संस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, संचालक मेजर जनरल (नि.) समीर कल्ला यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे हे यश प्राप्त झाले, असे सांगून डॉ. अभिजित औटी यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *