पुणे दि.३० : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी मुंबई येथील शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकारणी सदस्य सुप्रदा फातर्फेकर आणि बीडच्या शिवसेना महिला जिल्हा संघटक अँड. संगीता चव्हाण यांची नुकतीच राज्य शासनाने नियुक्ती केलेली आहे. त्या दोघींनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुप्रदा फातर्फेकर आणि ऍड.संगिता चव्हाण यांनी आयोगाच्या कामकाजाबद्दलच्या डॉ.गोऱ्हे यांच्या सूचना समजावून घेतल्या. त्याचसोबत पुणे शिवसेना महिला आघाडीच्या नवनिर्वाचित शिवसेना महिला शहर संघटक सौ.सविता मते, सौ.संगीता ठोसर, सौ.पल्लवी जावळे यांनी देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. या बैठकीत डॉ.गोऱ्हे यांनी संवादामध्ये काही मुद्दे मांडले यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने समाजाच्या विविध स्तरातील महिलांशी जोडून घेत असताना अनेक ठिकाणी जेथे आवश्यक आहे, तेथे प्रत्यक्ष जाऊन महिलांना सर्व प्रकरणे शासनाची मदत आणि समाजाचा हा दिलासा मिळवून देण्यासाठी काम करावे. अनेक चांगले कायदे झालेले आहेत त्या कायद्याच्या माहितीसाठी, अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एकजुटीने चांगल्याप्रकारे काम करावे. त्यासोबत धोरणात्मक मुद्यांवर अंमलबजावणी मध्ये विधानपरिषदेचा उपसभापती या नात्याने त्यांना सहकार्य लागेल ते सहकार्य राज्य महिला आयोगासाठी राहील असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर शिवसेना महिला शहरसंघटक यांच्याशी बोलत असताना डॉ.गोऱ्हे यांनी पुणे शहरांमध्ये वेगवेगळ्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यांचा संवाद राहण्याच्या दृष्टीने कोव्हीड काळामध्ये ऑनलाईन बैठका त्याचबरोबर प्रत्यक्षातील प्रशिक्षण तसेच जास्त गर्दी न करता जो शक्य आहे तेवढा संपर्क वाढविण्याच्या सूचना केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे हे पूर्णपणाने महिला सुरक्षिततेच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. ज्या ज्या ठिकाणी पोलिसांचे भरोसा सेल काम करत आहे. त्या सर्व ठिकाणाशी समन्वय आणि शिवसेना महिला आघाडीने समन्वय व संवाद साधावा असे ही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. त्यासोबत ना. आदित्यजी ठाकरे हे अनेक ठिकाणी महिलांच्यासाठी उपक्रम राबवत आहेतच पण विशेष म्हणजे नाशिक येथे ज्या महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागत होती. त्यात सुद्धा ना. आदित्यजी ठाकरे यांनी स्वतः हस्तक्षेप करून त्या महिलांचे दिवसभराचे श्रम वाचवून त्यांच्या सुरक्षिततेच्यासाठी म्हणून ते स्वतः उभे राहिले आणि राज्य शासन त्यांनी महिलांच्या बरोबर आहे याची ग्वाही दिलेली आहे. ना.उद्धवजी ठाकरे आणि ना.आदित्य ठाकरे अभिनंदन यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केले. हे सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवून शिवसेना हि ”श्री विठ्ठलाने जसे जनाबाईचे श्रम वाचवले” त्या पद्धतीच्या भक्तिभावातून महिलांच्या बरोबर आहे अशा प्रकारची भावना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी प्रकट केली.