माध्यम व्यवस्थापन, जनसंपर्काची उत्कृष्ट, विश्वासार्ह सेवा देण्यासाठी कटिबद्ध
– उचित मीडिया अँड पीआर
आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात जनसंपर्क, प्रचार व प्रसिद्धीला अतीव महत्व आहे. प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने तुम्हाला जनमानसात पोहोचवण्याचे, तुम्हाला वलय प्राप्त करून देण्याचे काम उचित मीडिया सर्व्हिसेस ही पीआर एजन्सी गेली नऊ वर्षे यशस्वीपणे करीत आहे. पुण्यातील एक उत्कृष्ट व विश्वासार्ह सेवा देणारी एजन्सी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या उचित मीडियाचे यंदा दशकपूर्ती वर्ष आहे. दशकपूर्तीच्या निमित्ताने घेतलेला आढावा…
प्रसिद्धी, जनसंपर्क आणि जाहिरात यासंबंधी सेवा पुरविण्याच्या उद्देशाने एप्रिल २०१५ मध्ये उचित मीडियाची सर्व्हिसेसची सुरुवात झाली. आज महाराष्ट्रातील काही मोजक्या आणि दर्जेदार पीआर एजन्सीमध्ये उचित मीडियाचे नाव घेतले जाते. क्लायंटला योग्य मार्गदर्शन, माध्यमांशी नियोजनबद्ध समन्वय आणि चांगली फलश्रुती यामुळे अल्पावधीत उचित मीडिया स्थिरावत आहे. मीडिया आणि पीआर उद्योगातील उणीवा दूर करण्याच्या आणि चांगले काम करणाऱ्या घटकांना प्रसिद्धी देण्याच्या प्रेरणेने ठेवून सुरु झालेले काम विस्तारत आहे.
माध्यम व जनसंपर्क क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव, विद्यार्थी साहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी असलेले उचित मीडियाचे कार्यकारी संचालक जीवराज चोले यांच्या भरीव योगदानामुळे, सर्वांशी चांगल्या संपर्कामुळे यशाचा हा मार्ग विस्तारत आहे. उचित मीडिया सुरु करण्यापूर्वी त्यांनी एमआयटी संस्थेत जनसंपर्क अधिकारी, दैनिक सकाळ व केसरीमध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. चांगले काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रसिद्धी सेवा पुरविण्याच्या उद्देशाने जीवराज यांनी उचित मीडियाची सुरुवात केली.
एका कर्मचार्यापासून सुरू झालेल्या या कंपनीत आता ४-५ पूर्ण वेळ कर्मचारी आहेत, तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांत काही फ्रीलांसर आहेत. आठ-दहा क्लायंटपासून सुरु झालेला हा प्रवास आज शेकडो लोकांना, संस्थांना सोबत घेऊन चालू आहे. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सुदर्शन केमिकल्स, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, मुकुल माधव फाउंडेशन, ग्रॅव्हिट्स फाउंडेशन, विद्यार्थी सहायक समिती, केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, पुणे विद्यार्थी गृह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, काँग्रेस नेते अशा असंख्य क्लायंटला विश्वासार्ह, प्रामाणिक सेवा उचित मीडिया देत आहे.
शिक्षण, आरोग्य, उद्योग, राजकारण, सांस्कृतिक, साहित्यिक, कोर्पोरेट अशा सर्वच क्षेत्रात आज उचित मीडिया काम करत आहे. प्रेसनोट, पत्रकार परिषद, कार्यक्रमाची पूर्व व नंतरची प्रसिद्धी, जाहिरात वितरण, आशयलेखन अशा विविध सेवा पुरवल्या जात आहेत. पुण्यातील मराठी, हिंदी, इंग्रजी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, डिजिटल अशा जवळपास ५० माध्यम संस्थांशी व्यक्तिगत संपर्क असल्याने क्लायंटला समाधानकारक प्रसिद्धी मिळते. उत्तम आशयनिर्मिती हा उचित मीडियाचा यूएसपी आहे. उचित मीडियाच्या विस्तारासाठी जीवराज चोले प्रयत्नशील आहेत. ‘सर्जनशील न्यूज’ हे युट्युब चॅनेल व न्यूज वेबपोर्टल उचित मीडियाच्या वतीने चालवण्यात येते.
कसे पोहचाल आमच्या पर्यंत ?