खवैय्या पुणेकरांच्या चांगल्या आरोग्याच्या, जीवनशैलीसाठी ‘कोको अँड को’ सॅलड बार
पुणे : कोरोना संसर्गानंतर लोकांना आरोग्यदायी जीवनशैली जपण्यासाठी आणि समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी कोथिंबीर कोशिंबीर’ (कोको अँड को) (KoKo & Co) आणि न्यूट्रिअस फार्म(Nutrius Farm) यांच्याकडून अवशेषमुक्त (Healthy) भाज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. कोथरूड परिसरातील वनाजजवळ ‘कोथिंबीर कोशिंबीर’ नावाने ‘विकेंड सॅलड बार'(Salad Bar) सुरु करण्यात आला असून, शनिवारी व रविवारी विविध प्रकारचे आरोग्यदायी सॅलड्स येथे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती ‘कोको अँड को’च्या संस्थापिका, तसेच सस्नेह माईंड अँड बॉडी हीलिंग सेंटरच्या प्रमुख आणि नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉ. स्नेहा जोगळेकर यांनी दिली.
पुण्यातील(Pune) या पहिल्याच अनोख्या बारचे उद्घाटन सोमवारी झाले. प्रसंगी न्युट्रियस फार्मचे सहसंस्थापक समीर पोकळे, राहुल म्हसकर, ‘कोको’चे वरुण जोगळेकर, निष्का जोगळेकर, अथर्व मराठे, अतुल पराडकर आदी उपस्थित होते. हा सॅलड बार फक्त विकेंडला उघडा राहणार असून, इतर दिवशी होम डिलिव्हरी दिली जाणार आहे. एक, दोन व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंबासाठी ही सॅलड सेवा पुरविली जाणार आहे. तसेच सॅलड थाळी पुणेकरांना चाखता येणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा ४०-५० सॅलड्सची मेजवानी मिळेल. आठवड्याचे सबस्क्रिप्शन घेण्याचीही सोय असणार आहे. आरोग्य सर्वोच्च स्थानी ठेवत सामान्य माणसाला परवडेल अशा वाजवी दरात उत्तम प्रतीचे सॅलड्स आणि भाज्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे वरुण जोगळेकर यांनी सांगितले.
“अवशेषमुक्त भाज्यांच्या सेवनातून लोकांचे आरोग्य चांगले राहावे, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी आणि शाश्वत निसर्गाची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याचा यामागे उद्देश आहे. ‘न्यूट्रिअस’ एक अवशेषमुक्त, हायड्रोफोनिक (पाण्यावरील) आणि मातीविरहित फार्म आहे, जिथे आपण थेट घरी शहरी शेती क्षेत्रात सकारात्मक प्रभाव आणू इच्छितो आणि एक शाश्वत पौष्टिक समुदाय तयार करू इच्छितो जे आपण एक संस्कृती म्हणून पुढच्या पिढीला देऊ शकतो. या भाज्यामधील पोषकता कायम राहते आणि आठवडाभर या भाज्या टिकतात,” असे समीर पोकळे यांनी नमूद केले.
डॉ. स्नेहा जोगळेकर म्हणाल्या, “कोरोनानंतर लोकांना थोडे मोकळे वाटावे, त्यांना चांगल्या आरोग्यासाठी प्रेरित करावे यासाठी लवकरच जेएससी एज्युकेशनल ट्रस्टतर्फे कम्युनिटी सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांना व टप्प्याटप्प्याने सर्वच नागरिकांना या कम्युनिटी सेंटरचा लाभ घेता येणार आहे. या कम्युनिटी सेंटरमध्ये केवळ खेळच नाही, तर वाचन संध्या, ग्रुप व्हीजीटस् बार्बेक्यू, पिकनिक व अन्य उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येकाला या कम्युनिटी सेंटरमध्ये आपला वेळ आनंदाने घालवता यावा, हा उद्देश आहे. अतिशय वाजवी दरात कम्युनिटी सेंटरच्या उपक्रमांत सहभागी होता येणार आहे.”