सूर्यदत्त लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा निकाल १०० टक्के; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के
विद्यापीठाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा होणार गौरव
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के; विद्यापीठाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा होणार गौरव
पुणे, दि. २९- सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ( The results of Suryadutt Law College, run by Suryadutt Education Foundation, have been 100 percent. ) बीएएलएलबी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ परीक्षेत चमकदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. गुणवत्तेचा वारसा जपत, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, समर्पित दृष्टिकोन आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर हे यश मिळवले.
प्रथम वर्ष बीएएलएलबी अभ्यासक्रमात कृष्णा धायगुडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. विदुला जांभेकरने दुसरा, समीरा नदाफने तिसरा, तर दीपशिखा हिने चौथा क्रमांक मिळवला. दुसऱ्या वर्षात खुशी भीमटे हिने प्रथम, आख्या उपमन्युने दुसरा, श्रुती वैद व श्रुतीका पवार यांनी संयुक्तपणे तिसरा, तर प्रीती ढेंबरे हिने चौथा क्रमांक पटकावला. सायबर कायदा या डिप्लोमा अभ्यासक्रमात शुभदा कोठावदे यांना प्रथम, तर डॉ. मोनिका सहरावत यांना द्वितीय क्रमांक मिळाला. लेबर लॉ व लेबर वेल्फेअर या डिप्लोमामध्ये रुपेश बनसोडे यांना प्रथम, तर केतकी बापट यांना द्वितीय क्रमांक मिळाला.
सर्व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा स्तर अधिक उंचावला आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी अभिनंदन केले. “सूर्यदत्ता लॉ कॉलेज हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेची जाण असलेले जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यावर भर देते. या गुणवंत विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या विश्वासाला योग्य ठरवले आहे,” असे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकवर्ग यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीताशी संलग्नित सूर्यदत्त लॉ कॉलेजची स्थापना २०२२ साली झाली असून, त्याला उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता प्राप्त आहे. अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण कायदा शिक्षण देणारी संस्था म्हणून ‘सूर्यदत्त’ची ओळख झाली आहे. महाविद्यालयाला बेस्ट इमर्जिंग लॉ कॉलेज म्हणून ‘प्राईड भारत पुरस्कार २०२३’, ‘जयप्रकाश नारायण पुरस्कार २०२३’, ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार २०२४’ आणि ‘आयआयआरएफ एजुकेशन इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५’ने गौरवण्यात आले आहे. ‘सूर्यदत्त’मध्ये सध्या पाच वर्षीय बीएएलएलबी आणि डिप्लोमा इन सायबर लॉ व डिप्लोमा इन लेबर लॉ हे अभ्यासक्रम सुरु आहेत. ( ‘Suryadutt’ currently offers five-year BA LLB, Diploma in Cyber Law and Diploma in Labor Law courses.) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाविद्यालयात पाच वर्षीय बीबीएएलएलबी, तीन वर्षीय एलएलबी, एलएलएम, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज, डिप्लोमा इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स लॉज व सर्टिफिकेट कोर्से इन फॉरेन्सिक अँड मेडिकल जुरीसप्रुडंन्स हे नवीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मणियार यांनी दिली.