सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये

 

‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५: मॅनेजिंग थ्रू इंडियन विस्डम’ उपक्रम

‘सूर्यदत्त’मध्ये आयोजित ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’मधून

विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला मौन, वाचन व चिंतनाचा अनुभव 

मौन व वाचनाने मिळते विद्यार्थ्यांतील एकाग्रता वाढण्यास चालना

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’चे आयोजन

पुणे, दि  २०- सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५: मॅनेजिंग थ्रू इंडियन विस्डम’ अर्थात सलग नऊ तास मौन वाचन महोत्सव: भारतीय तत्वज्ञानातून व्यवस्थापनाचा मार्ग दाखवणाऱ्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात    (The event was held with great enthusiasm at the Bansi-Ratna Auditorium in the Bavdhan campus of ‘Surya Dutt’.) झाला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नेतृत्वात ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आणि कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांच्या मार्गदर्शनात न्युरोफिजियोथेरपीच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. हर्षदा कुंभार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

ही अनोखी शैक्षणिक संकल्पना तब्बल २०० हून अधिक फिजिओथेरपी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना एकत्र आणणारी ठरली. त्यांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहत सलग ९ तास पूर्ण शांतता पाळली. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके, स्व-सहाय्यता, व्यक्तिमत्त्व विकास विषयक पुस्तके, जर्नल्स, संशोधन प्रबंध, अभ्यास साहित्य आणि अन्य शैक्षणिक स्रोतांचे वाचन केले. त्यांनी एकाग्रतेने वाचन, टिपण, तसेच लेखन, काव्यरचना आणि अंतर्मुख चिंतन करत पूर्ण शांतता पाळली. त्यामुळे सखोल अभ्यास आणि जागरूक लेखनाची सवय पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न यामधून झाला. मीनल गावंडे यांनी वॉर्मअप व योग सत्रांतून उपस्थितांमध्ये ऊर्जादायी वातावरण निर्माण केले.

विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आपल्या मनोगतातून या सत्रातील अनुभव अत्यंत भावनिक शब्दांत मांडले. सततच्या स्क्रीन वापरामुळे होणारे दुष्परिणाम या निमित्ताने त्यांना प्रकर्षाने जाणवले. या शांततेत त्यांनी अधिक एकाग्रता अनुभवली, सर्जनशीलतेला चालना मिळाली आणि नव्या कल्पना रुजवून त्या लेखी मांडण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. डॉ. हर्षदा कुंभार आभार मानले. डॉ. सीमि रेठरेकर यांनी आशावादी भविष्याच्या प्रार्थनेने समारोप केला. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वीतेमागे सर्वांचा समर्पित सहभाग आणि प्रेरणादायी नेतृत्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

(Prof. Dr. Sanjay chordiya said )प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून सलग नऊ तास मौन ठेवत वाचन, लेखन करण्याचा ‘इंडियन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ नावावर करणारे पहिले फिजिओथेरपी कॉलेज होण्याचा मान मिळाला आहे. पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, रोजगार व कौशल्याभिमुख शिक्षण देऊन जागतिक स्तरावर सक्षमपणे योगदान देणारे व्यक्तिमत्व घडवण्यावर सूर्यदत्त संस्थेने नेहमीच भर दिला आहे. एकाग्रता, वाचन व चिंतन विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या स्थिर व सक्षम, समृद्ध आणि सर्वंकष ज्ञानी बनवण्यास मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *