पुणे, दि. ५- सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. समाजाच्या गरजांना पूरक आणि जागतिक आरोग्य क्षेत्राला आवश्यक हेल्थकेअर प्रोफेशनल्स घडविण्याचे ध्येय ‘सूर्यदत्त’ने ठेवले आहे. नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. बॅचलर ऑफ फिजिओथेरपीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले.
प्रथम वर्षाचा निकाल ८७ टक्के लागला असून, अनुष्का सोनवणे हिने (७५.१० टक्के) पहिला, कोमल श्रीश्रीमल हिने (७४.८० टक्के) दुसरा, श्रुती भदाणे हिने (७४.२ टक्के) तिसरा, ऋतुजा सेवेकरी हिने (७२ टक्के) चौथा, तर भार्गवी बीडकर हिने (७१.२० टक्के) पाचवा क्रमांक पटकवला. द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये सुमन चौधरी हिने (६९.५ टक्के) पहिला, साक्षी शिंदे हिने (६८.८० टक्के) दुसरा, हेतल ओझा हिने (६८.५७ टक्के) तिसरा, सृष्टी माहेश्वरी हिने (६८.४० टक्के) चौथा, तर दिया शेटे हिने (६८.२८ टक्के) पाचवा क्रमांक मिळवला. तिसऱ्या वर्षातही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करताना गायत्री राजगुरू (७०.२० टक्के), याहवी बाराई (६९.६० टक्के), मयुरी अडवाडे (६९.२० टक्के), माहेश्वरी रणसुभे (६७.६० टक्के) व लॉरी पालरेषा (६७.४० टक्के) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकवला.
‘सूर्यदत्त’ ही संस्था शैक्षणिक गुणवत्तेला वैद्यकीय प्रात्यक्षिकांची, संशोधक वृत्तीची आणि तात्विक सेवेची जोड देणारी आहे. ( ‘Suryadatta’ is an institution that combines academic excellence with medical practice, research spirit and philosophical service.) फिजिओथेरपी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच महाविद्यालयाची सातत्यपूर्ण कामगिरी होत आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्व व मार्गदर्शनात संस्थेतील विद्यार्थी दरवर्षी अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. (Under the visionary leadership and guidance of the founder president of Suryadatta Education Foundation, Prof. Dr. Sanjay B. Chordia, and the vice president of the organization, Sushma Sanjay Chordia, the students of the organization are performing proudly every year. ) उभयतांचे अथक परिश्रम, इनोव्हेशनवर असलेला भर, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय यामुळे ‘सूर्यदत्त’ संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. सीमी रेठरेकर यांनी या यशात एकत्रित प्रयत्नांचे योगदान असल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या, “हा उज्ज्वल निकाल संस्थेतील विद्यार्थ्यांची शिस्त, जिद्द, समर्पण आणि अथक परिश्रमाची फलश्रुती आहे. सर्व शिक्षक व व्यवस्थापनातील मार्गदर्शकांचे योगदान मोठे आहे. सूर्यदत्त संस्थेसाठी हा क्षण अभिमानाचा आहे. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांचे मार्गदर्शन व पाठिंबा प्रेरणादायी आहे.”
फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या यशात विद्यार्थ्यांसह त्यांचे सर्व शिक्षक, पालक यांचा वाटा आहे. त्या सर्वांचे अभिनंदन करतो. वैद्यकीय क्षेत्रात आरोग्यसेवा देणारे चांगले प्रोफेशनल्स तयार व्हावेत, यासाठी सूर्यदत्त संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवा ही ईश्वरसेवा आहे आणि ही सेवा करणाऱ्या तरुण-तरुणींना घडविण्याचे काम करता येते आहे, याचे समाधान आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातील ज्ञानासह प्रात्यक्षिक अनुभवांचे शिक्षण देण्यावर आम्ही भर देतो. त्यामुळे विद्यार्थी अधिक रोजगारक्षम, कुशल बनतात व त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतात.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन