सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के; विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के; विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी

 
 
पुणे, दि. १८ – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बावधन येथील सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा (एसआयआयसीएस) निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के  )The results of Suryadatta International Institute of Cyber ​​Security (SIICS), Bavdhan, run by Suryadatta Education Foundation, have been 100 percent for the third consecutive year.)    लागला आहे. नेहा लड्ढा हिने ८४.०४ टक्के मिळवून प्रथम, रितू चौधरी हिने ८३.५ टक्के मिळवत द्वितीय, तर परेश कुलकर्णी याने ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
(Prof. Dr. Sanjay chordiya said)प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात सक्षम व्यावसायिक घडवण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञान आणि उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘सूर्यदत्त’मध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यास कटिबद्ध आहोत. ही सातत्यपूर्ण कामगिरी सायबर आणि डिजिटल सायन्स या क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती व भविष्यकालीन शिक्षणप्रणालीप्रती ‘एसआयआयसीएस’च्या दृढ वचनबद्धतेची साक्ष आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात स्थापनेपासूनच ‘एसआयआयसीएस’ सायबर सुरक्षेच्या शिक्षणात अग्रेसर राहिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली सायबर आणि डिजिटल सायन्समध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या पहिल्या संस्थांपैकी एक आहे.”
 
संस्थेच्या यशाचे श्रेय तिच्या नवोन्मेषपूर्ण शैक्षणिक मॉडेलला जाते. जे वर्गखोलीतील शिक्षणासोबतच वास्तव जगातील अनुभवही विद्यार्थ्यांना प्रदान करते. या मॉडेलमध्ये जागतिक मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन प्रशिक्षण, नियमित औद्योगिक भेटी, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक व उद्योगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन आदी गोष्टींचा समावेश आहे. विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करून त्यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळेच यशाची ही शिखरे गाठता येत आहेत, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

‘एसआयआयसीएस’मध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ‘सायबर आणि डिजिटल सायन्स’ या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सध्या उद्योगक्षेत्रात विशेष कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची वाढती गरज लक्षात घेता, याच शैक्षणिक वर्षापासून ‘एसआयआयसीएस’मध्ये सायबर सिक्युरिटी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *