सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर)
‘आयआयआरएफ २०२५’ क्रमवारीत देशात ४२वे, महाराष्ट्रात आठवे स्थान
आयआयआरएफ’ क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीचे यश
पुणे, दि. २३ – “इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (आयआयआरएफ) सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर) मिळालेले यश गुणवत्ता, नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या शिक्षणाप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचे द्योतक आहे. ‘सूर्यदत्त’मध्ये केवळ व्यावसायिक फार्मासिस्ट नव्हे, तर समाजाभिमुख व राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे जबाबदार नागरिक घडवले जातात,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. (“‘Suryadutt’ not only produces professional pharmacists, but also socially oriented and responsible citizens who contribute to nation building,” asserted Prof. Dr. Sanjay B. Chordia, Founder Chairman of Suryadutt Education Foundation.) कॉलेजचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चने (एससीपीएचआर) पुन्हा एकदा राष्ट्रीय व राज्य स्तरावर आपली छाप पाडली आहे. नवीदिल्ली येथील ‘आयआयआरएफ’तर्फे जाहीर झालेल्या फार्मसी कॉलेज रँकिंग २०२५ मध्ये ‘एससीपीएचआर’ने देशात ४२ वा, महाराष्ट्रात आठवा आणि पश्चिम विभागात १० वा क्रमांक मिळवला आहे.(In the Pharmacy College Rankings 2025 released by IIRF, New Delhi, SCPHR has secured 42nd position in the country, 8th in Maharashtra and 10th in the Western Region.)
देशभरात प्रतिष्ठा, पारदर्शकता आणि कॉर्पोरेट मान्यतेसाठी ओळखली जाणारी ‘आयआयआरएफ’ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून अधिकृत व वैविध्यपूर्ण अशा पद्धतीने जाहीर होते, जी उद्योग जगताकडूनही स्वीकारली जाते. रोजगार, अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पन्न व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या सात निकषांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते. ‘एससीपीएचआर’ने सातही निकषांवर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
(Prof. Dr. Sanjay chordiya said)प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “या क्रमवारीने सूर्यदत्तच्या समर्पित भावनेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव झाला आहे. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेच्या मान्यतेने बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मान्यतेने डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात. उत्साही विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक चांगले करिअर घडविता यावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सूर्यदत्तसाठी ही मान्यता प्रोत्साहन आहे. सद्यस्थितीत आरोग्य क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन इथे प्रात्यक्षिक व पाठ्यपुस्तकातील ज्ञान दिले जाते.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टी, शैक्षणिक कार्य व सामाजिक बांधिलकीमुळे सूर्यदत्त समूहाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गौरव मिळाले आहेत. (Prof. Dr. Sanjay B. Chordia’s vision, academic work and social commitment have earned the Suryadatta Group many accolades at the national and international levels. ) सुषमा चोरडिया यांचेही योगदान त्यामध्ये महत्त्वाचे आहे. स्त्री सक्षमीकरण, कौशल्य विकास, गुणवत्ता संवर्धन व सामाजिक जबाबदारीसाठी केलेल्या उपक्रमांमुळे शिक्षण अधिक समावेशक व परिणामकारक बनले आहे. अलीकडेच ‘सूर्यदत्त’मध्ये १० तासांचा सायलेंट रीडेथॉन २०२५ हा वाचन मॅरेथॉन उपक्रम इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवला गेला. फार्मोत्सव २०२५ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कला, नेतृत्व व नावीन्यपूर्णता सादर झाली. तसेच डी. फार्मा अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने १००% निकाल लावून शैक्षणिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन, उद्योगभेटी, पाहुणे व्याख्याने व अभ्यासदौरे यांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच उद्योगाभिमुख अनुभव मिळत आहेत.
‘एससीपीएचआर’ने नेहमीच विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती अवलंबली आहे. शिस्त, मूल्ये व नैतिकतेसह नवनिर्मितीवर भर दिला आहे. ही मान्यता आमच्या विश्वासाला अधिक दृढ करणारी आहे. दर्जेदार शिक्षण, मूल्ये आणि नवोन्मेष यांच्या संयोगातून जागतिक दर्जाचे व्यावसायिक घडवता येतात याचा आम्हाला विश्वास आहे. या यशाबद्दल प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.
– सुषमा चोरडिया, उपाध्यक्षा, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
