विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारपणा आणि सेवाभाव जागवणे महत्वाचे – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारपणा आणि सेवाभाव जागवणे महत्वाचे – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

 सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चतर्फे ‘फार्मोत्सव २०२५’चे आयोजन
 
नवनिर्मिती व समर्पित वृत्तीच्या जोरावर उत्तम व्यावसायिक घडतो
सुषमा चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चतर्फे ‘फार्मोत्सव २०२५’चे आयोजन
 
पुणे, दि. १३ –  ‘विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आणि त्यांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी गुणवंतांचा गौरव उपयुक्त ठरतो. त्यातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची भावना व सेवाभावी वृत्तीची जोपासना होण्यास मदत होते. विविध कार्यक्रमातून सूर्यदत्त संस्था विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा अविरत प्रयत्न करते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया  (Founder Chairman of Suryadutt Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia) यांनी केले.
 
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (एससीपीएचआर) व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (एनपीडब्ल्यूए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मोत्सव २०२५’ सोहळ्यात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. (  Prof. Dr. Sanjay B. Chordia was speaking at the ‘Pharmotsav 2025’ function )  महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे माजी अध्यक्ष व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील, पुणे प्रादेशिक तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, ‘एनपीडब्ल्यूए’चे सहसाचिव प्रा. प्रवीण जावळे आदी उपस्थित होते. 
 
यावेळी प्रा. पोपट जाधव यांना डॉ. एच. एम. कदम स्मृती पुरस्कार २०२५, डॉ. राजेंद्र पाटील व प्रा. सचिन इटकर यांना ‘एनपीडब्ल्यूए आयडॉल पुरस्कार २०२५’, तर चंद्रकांत वारघडे यांना वृक्षमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.  (On this occasion, Prof. Popat Jadhav was awarded the Dr. H. M. Kadam Memorial Award 2025, Dr. Rajendra Patil and Prof. Sachin Itkar were awarded the ‘NPWA Idol Award 2025’, and Chandrakant Warghade was awarded the Vrikshamitra Award.) अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त’च्या वतीने सर्व उपस्थित पाहुण्यांचा सूर्यदत्तचा स्कार्फ, पदक व मानपत्र देऊन सत्कार केला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात आयोजित सोहळ्यात २५० हुन अधिक मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य स्वर्गीय डॉ. एच. एम. कदम, ताथवडे येथील जेएसपीएम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य स्वर्गीय प्रा. प्रशांत हम्बर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
(Prof. Dr. Sanjay chordiya said) प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्यात अभिमान, प्रेरणा व जबाबदारीची भावना जागवणारा अविस्मरणीय सोहळा ठरला. फार्मोत्सवसारख्या व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो व समाजसेवेच्या ध्येयाने कार्य करण्याची जाणीव निर्माण होते. ‘सूर्यदत्त’मध्ये कायमच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नियमित उपक्रम घेतले जातात.
 
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या शैक्षणिक परंपरेला साजेशा पद्धतीने हा उत्सव पार पडला. फार्मसी क्षेत्रात नवनिर्मिती व समर्पणाने कार्य करणारे व्यावसायिक घडविण्याच्या ध्येयाला नवचैतन्य दिले. कोणत्याही क्षेत्रात व्यावसायिक यश संपादन करण्यासाठी नवनिर्मितीचा ध्यास व समर्पित वृत्तीने घेतलेले सातत्यपूर्ण परिश्रम महत्वाचे ठरतात, असे मत सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केले. 
 
प्रा. प्रवीण जावळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. ‘एससीपीएचआर’च्या प्राध्यापिका, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सारिका झांबड व महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. तस्लीम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले. डी. फार्मसी विभागप्रमुख स्नेहल जाधव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सोहळ्याचे यशस्वी संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *