सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंट

सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंट

 
 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंटची परंपरा 
सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांकडून कायम
 
देश-विदेशात ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गगनभरारी यश कौतुकास्पद
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंट
 
पुणे, दि. ६ – सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंट मिळवण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. देश-विदेशातील पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल्स व अन्य आस्थापनांमध्ये इंटर्नशिप व प्लेसमेंट मिळवत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांची ही उल्लेखनीय कामगिरी सूर्यदत्त संस्थेसाठी कौतुकास्पद व अभिमानस्पद असल्याची भावना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया      (Founder Chairman of Suryadutt Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia)    यांनी व्यक्त केली.
 
‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर प्रतिष्ठित हॉटेल्समध्ये उल्लेखनीय कामगिरी साधली आहे. कुणाल अमर चौरे, हर्षल अशोक गायकवाड व अनुराग पार्की यांची न्यूझीलंडच्या कॉर्डिस हॉटेल्समध्ये, तर अमेय अनिल पापळ, अविष्कार संतोष वाबळे यांची मॉरिशस येथील सीपॉईंट बुटीक हॉटेल येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. पुण्यातील द वेस्टिन, कोरेगाव पार्क येथे ओंकार मिरगुंदे, साईराज बालवडकर, संदीप लोंढे, प्रतीक सोनवणे, संग्राम गंजे व प्रदीप लगड यांना, तर द रिट्झ कार्लटनमध्ये निनाद फडके व अर्जुन नाम्बियार यांना संधी मिळाली आहे. मुंबईतील ट्रायडेंट बीकेसी येथे अविष्कार वाबळे, जे. डब्ल्यू. मॅरियट सहार मध्ये पायल धनवे, मेरिएट जयपूर येथे श्रद्धा चव्हाण यांनी इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. इतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हॉटेलांमध्ये इंटर्नशिप, प्लेसमेंट मिळाली आहे. याआधीही सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यासह इतर अनेक देशांत ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. मॉरिशसमधील शांग्रीला हॉटेल, जर्मनीतील रिटलबर्ग हॉटेल, मलेशियातील हिल्टन, चीनमधील इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड, सिंगापूरमधील द रिजंट, अमेरिकेतील हॉलिडे इन, फ्लोरिडामधील रिनाइसन्स, पटायातील सन सिटी, सिंगापूरमधील मेरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. तसेच अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसायही सुरु केला आहे.
 
(Prof. Dr. Sanjay chordiya said) प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृतीधारक आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘एससीएचएमटीटी’ची स्थापना २००५ मध्ये झाली. संस्थेने २१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. कॉलेजला आयएसओ ९००१:२०१५ असे प्रमाणपत्र मिळालेले आहे. ‘एससीएचएमटीटी’तर्फे बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम चालवला जातो. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक घडविण्यावर येथे भर दिला जातो. अभ्यासक्रमातील शिक्षणासोबतच ‘एससीएचएमटीटी’च्या वतीने प्रस्थापित हॉटेल्स,रेस्टारंट,औद्योगिक कंपन्यांना भेटी, विविध विभागातील तज्ज्ञांचे चर्चासत्र, राजस्थान, गोवा, कर्नाटक अशा विविध राज्यातील स्वादिष्ट भोजन, विविध संकल्पनेवर आधारित फूड फेस्टिवल आयोजिले जातात. या क्षेत्रातील प्रत्यक्ष आणि व्यापक ज्ञान विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी अनेक उपक्रम राबवून त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते.”
 
“जागतिक स्तरावरील कामकाजाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी ‘एससीएचएमटीटी’ने स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ मलेशिया, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपीटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट आदी नामांकित वैश्विक संस्थांशी सामंजस्य करार करून शिक्षणाचा दर्जा अधिक समृद्ध केला आहे. गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण, इंटर्नशिपच्या संधी, प्लेसमेंट्स आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा, यासाठी ग्लोबल ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या यादीमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम क्षेत्र विभागात तिसरे स्थान मिळाले आहे. याआधीही हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील ‘सूर्यदत्त’ला सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणून विविध नामांकित संस्थांच्या वतीने गौरवान्वित केलेले आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

 
 

‘एससीएचएमटीटी’ने २०२१ मध्ये ‘सूर्यदत्त महामिसळ’ उपक्रमातून सात तासात ३० व्यक्तींच्या मदतीने सात हजार किलो मिसळ बनवून तीन तासात ३०० सामाजिक संस्थामार्फत ३० हजार लोकांना ती मिसळ वाटण्याचा अनोखा जागतिक विक्रम   ( In 2021, ‘SCHMTT’ set a unique world record by making seven thousand kilos of misal with the help of 30 people in seven hours through the ‘Suryadatta Mahamisal’ initiative and distributing it to 30,000 people through 300 social organizations in three hours.)   केला आहे. याचबरोबर विक्रमी वेळेत ऊर्जा प्रदान करणारी चिक्की बनविणे, उपवास करणाऱ्या भक्तांकरिता शाबूची खिचडी बनविणे आणि ती स्वयंसेवकांमार्फत लोकांना वितरित करण्यासह याबरोबरच ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी सलग २४ तास प्रबोधनासाठी लेखन, वाचन, विचार करणे, शिकणे, मौन पाळणे, नवकल्पनांचे आविष्कार, संशोधन व इनोव्हेशन असा एकत्रित उपक्रम केला असून, त्याचीही नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

(Sushma chordiya said)सुषमा चोरडिया म्हणाल्या, “२१ वर्षाच्या प्रवासात ‘सूर्यदत्त’ने हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळण्यासाठी सूर्यदत्त, तसेच अन्य महाविद्यालयातील नियमित जॉब फेअर, कोरोना काळात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ बनवणे व वाटप करणे असे उपक्रम सीएसआरअंतर्गत राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना उद्योजकीय कौशल्ये शिकविली जातात. ५० हुन अधिक देशांत मुलांनी इंटर्नशिप केल्या आहेत. यासह विद्यार्थ्यांना फिटनेस, ब्युटी वेलनेस, जिम, एअरहोस्टेस असे विविध अल्पकालीन अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे या मुलांना मल्टीटास्किंग जमते. तसेच विद्यार्थ्यंमध्ये आत्मविश्वास वाढतो. उद्योग व्यवसायाबद्दल रुची वाढते. तसेच उत्कृष्ट संयोजन कौशल्यामुळे सूर्यदत्तचे विद्यार्थी हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंटची परंपरा सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमने यंदाही अभिमानाने कायम राखली आहे. हे यश सूर्यदत्तच्या गुणवत्ता, निष्ठा व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *