लंडनमधील ‘सूर्यदत्त’च्या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्यात
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव
जागतिक पातळीवर यशस्वी नेतृत्व घडण्यात ‘सूर्यदत्त’चे संस्कार मोलाचे
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; लंडनमध्ये ‘सूर्यदत्त’च्या माजी विद्यार्थ्यांचा जागतिक साप्ताहिक मेळावा उत्साहात
पुणे, दि. २० – सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने ‘यूके सूर्यमिलन २०२५’ या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे लंडन येथे नुकतेच आयोजन केले होते. या सोहळ्यात युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षण घेत असलेले, तसेच करिअरमध्ये प्रगती करणारे अनेक सूर्यन्स (सूर्यदत्तचे माजी विद्यार्थी) उत्साहाने सहभागी (Suryans (former students of Surya Dutt) participated enthusiastically) झाले. या संस्मरणीय मेळाव्याला ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (prof. Dr. Sanjay chordiya) आणि उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सूर्यदत्त माजी विद्यार्थ्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट इन ग्लोबल करिअर’ने सन्मानित करण्यात आले.
यूकेमधील विविध विद्यापीठांना आठवडाभर चाललेल्या भेटीदरम्यान, प्रा. डॉ. चोरडिया यांनी ‘सूर्यदत्त’च्या माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या भेटून त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक यशाबद्दल अभिनंदन केले. प्रत्येक भेटीतून संस्थेचा आपल्या माजी विद्यार्थ्यांशी असलेला आजीवन संबंध पुन्हा अधोरेखित झाला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची महत्त्वपूर्ण टप्पे, भविष्यातील ध्येये तसेच जागतिक स्तरावर उपलब्ध होत असलेल्या नव्या संधींबद्दल अनुभव शेअर केले. आपल्या यशामध्ये सूर्यदत्तामधील शिक्षण, मूल्ये व संस्कार यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. सूर्यदत्तने दिलेल्या नैतिकता, नेतृत्वगुण आणि सर्वांगीण विकासाच्या संस्कारांनीच जागतिक स्तरावर यश मिळवू शकलो, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
(Prof. Dr. Sanjay chordiya said)प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “तुमचे यश हे तुमच्या जिद्दीचे आणि सूर्यदत्तमधून मिळालेल्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे. जागतिक स्तरावर वाटचाल करताना सतत शिकणे आणि नैतिक नेतृत्व हेच तुम्हाला इतरांपासून वेगळे ठरवेल. तुमच्या भावी वाटचालीस सूर्यदत्तकडून मनःपूर्वक शुभेच्छा. आज सूर्यदत्तचे एक लाखाहून अधिक माजी विद्यार्थी भारतात व जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. अनेकांनी जागतिक ख्यातीच्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदे भूषवली आहेत, तर काहींनी प्रभावी स्टार्टअप्स सुरू केले आहेत किंवा आपल्या कौटुंबिक व्यवसायाला व्यावसायिक दृष्टीकोन देत पुढे नेले आहे.”
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘सूर्यदत्त’च्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील बावधन कॅम्पसमध्ये ‘सूर्यमिलन’ सोहळा हा माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. यात अनुभव शेअर करणे, कनिष्ठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील विशेष योगदानाचा गौरव करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. ‘सूर्यन्स’ हेच सूर्यदत्तचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांचे यश आणि योगदान हेच संस्थेच्या मूल्यांचा व उत्कृष्टतेचा ठसा उमटवणारे आहे. सूर्यदत्त अल्युमनी असोसिएशन व अल्युमनी पोर्टलच्या माध्यमातून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स सतत संवाद, करिअर सपोर्ट व शैक्षणिक अपडेट्स पुरवित राहते, ज्यामुळे माजी व विद्यमान विद्यार्थ्यांमधील सेतू अधिक मजबूत होत राहतो,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
