पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमला (एससीएचएमटीटी) ‘बेस्ट इन्स्टिट्यूट इन हॉटेल मॅनेजमेंट’ या पुरस्कराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी असणाऱ्या आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा ‘टाइम्स’ संस्थेकडून नुकताच सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी संस्थेच्या यशाबद्दल ‘एससीएचएमटीटी’चे सर्व पदाधिकारी व सेवकवर्गाचे अभिनंदन केले. सातत्याने सर्वोत्कृष्ट राहण्याबद्दल मार्गदर्शन केले.
‘एससीएचएमटीटी’ हे महाविद्यालय हॉटेल व्यवस्थापनातील सर्वोकृष्ट अभ्यासक्रम प्रदान करते. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक आणि प्रात्याक्षिकाच्या आधारे सेवावर्गातील क्षेत्राचा अनुभव दिला जातो. ज्ञानासह सभ्यता आणि शिष्टाचाराचे सर्वोत्कृष्ट धडे इथे दिले जातात. दिल्ली येथील ‘जीएचआरडीसी’ने जाहीर केलेल्या क्रमवारीत ‘एससीएचएमटीटी’ला महाराष्ट्रातील दुसरे, तर पश्चिम विभागातील चौथे स्थान प्राप्त झाले आहे.
कौशल्याधारित अभ्यासक्रमासह संवाद आणि इतर जीवनावश्यक कौशल्यांचा विद्यार्थ्यांना लाभ होतो, तसेच तज्ञांचे मार्गदर्शन व उद्योगातील सर्वोत्तम हॉटेल्स व संबंधित उद्योगांना भेटीचे नियोजन संस्थेकडून केले जाते. या सर्व बाबींचा विचार करुन ‘टाइम्स’ संस्थेने ‘टाइम्स एज्युकेशन आयकॉन्स-२०२१’ मध्ये सूर्यदत्ता कॉलेजला सन्मानित केले. ‘सूर्यदत्ता’च्या वतीने फॅमिली मॅनेज्ड बिझनेस अँड इंटरनॅशनल रिलेशन्सच्या संचालिका स्नेहल नवलखा आणि सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट अँड ट्रॅव्हल टुरिझमचे उल्हास चौधरी यांनी प्रख्यात अभिनेते कुणाल कपूर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.