‘आयआयआरएफ’ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून अधिकृत व वैविध्यपूर्ण अशा पद्धतीने जाहीर होते, जी उद्योग जगताकडूनही स्वीकारली जाते. रोजगार, अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पन्न व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या सात मुद्यांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ही आरोग्य व संबंधित क्षेत्रातील नामवंत शिक्षणसंस्था आहे. उत्साही विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक चांगले करिअर घडविता यावे, यासाठी प्रयत्नशील अशी संस्था आहे.
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा पूर्णवेळ, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड व्होकेशनल एज्युकेशन एक्झाम (एमएसबीव्हीईई) संलग्नित फिजिओथेरपी पदविका, नॅचरोथेरपी पदविका, नर्सिंग केअर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डेंटल असिस्टंट, आॅप्थाल्मिक टेक्निशियन हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. तंत्रज्ञानाभिमुख, सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे गुणवत्तापूर्ण केंद्र म्हणून पुढे येण्याचा सूर्यदत्तचा उद्देश आहे. संशोधन, ज्ञान, प्रशिक्षण देऊन आरोग्य क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी फिजिओथेरपी मधील चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स काम करत आहे. समाजाला उपयुक्त असे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन उपलब्ध केले जाते.
आरोग्य विज्ञानाशी संबंधित सर्व पायाभूत अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. पुण्यातील विविध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व क्लिनिकल अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. फिजिओथेरपी आणि संबंधित क्षेत्रातील विशेष क्षेत्रात पुरेसा अनुभव असलेल्या प्राध्यापकांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली या रुग्णालयांमध्ये क्लिनिकल प्रशिक्षण दिले जाते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या आरोग्य विज्ञान क्षेत्रात असलेल्या उत्सुकतेमुळे हे होत आहे, असे प्राचार्या डॉ. सीमी रेठरेकर यांनी नमूद केले.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि भारत विकास परिषद यांच्या सहकार्याने दिव्यांगासाठी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स वितरण शिबिराचे आयोजन केले जाते. शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय कार्याबद्दल आजवर सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
