
सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ग्लोबल चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठी म्हणाले, “७५ वर्षांचा प्रवास साजरा करताना आनंदाची भावना आहे. कंपनीच्या सुरुवातीपासून साधेपणा, काटेकोर अंमलबजावणी, ग्राहक व नियामक मानकांचे पालन आणि शाश्वत उत्पादन यावर भर देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील रोहा आणि महाड येथील उत्पादन प्रकल्पांनी या मूल्यांना बळकटी दिली असून, कंपनीच्या कार्यक्षमतेत आणि सामाजिक सहभागात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ‘सुदर्शन’ने मार्च २०२५ मध्ये जर्मनीस्थित ह्युबॅक ग्रुपचे अधिग्रहण केले. ‘सुदर्शन’च्या प्रवासातील हा महत्वाचा टप्पा असून, यामुळे सुदर्शनची तांत्रिक क्षमता, उत्पादनाची व्यापकता आणि जागतिक स्तरावर अस्तित्व वाढले आहे.”
“पुणे, रोहा आणि महाड येथे ‘सुदर्शन’चा पाया आहे. मूल्यांवर आधारित आणि जबाबदारीची संस्कृती जोपासल्याने आम्हाला जागतिक स्तरावर अधिक मजबूत होता आले. ७५ वर्षांच्या या प्रवासातील मूल्यांना पुढे घेऊन जात औद्योगिक वाढीसोबतच शाश्वतता, सुरक्षितता आणि समाजविकासावरही आमचा भर राहील. आगामी काळात जागतिक ओळख अधिक मजबूत करत ग्राहक, कर्मचारी आणि समाजासोबत प्रगती साधण्याला प्राधान्य असणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
