सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज

वैश्विक विकास व त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम
व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावा : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज
 
पुणे: सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशन (Suryadatta Group of Institute) संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज-एनएसई) बांद्रा (मुंबई) येथील कार्यालयास भेट दिली. शेअर बाजाराचे काम नेमके कसे चालते, हे जाणून घेण्याचा या भेटीचा उद्देश होता. तसेच चांगली गुंतवणूक, बचत आणि त्यातून नफा मिळवण्याबाबत ज्ञान घेतले. प्रा. प्रल्हाद जोशी, डॉ. रागिणी भट, प्रा. सुनील धनगर आणि प्रा. ज्योती गायकवाड यांच्यासह ‘एमबीए’च्या ३५ आणि ‘पीजीडीएम’च्या ३५ विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदवला. येथील अधिकाऱ्यांशी भेटून शेअर बाजाराविषयी माहिती घेतली.
 
‘एनएसई’चे अधिकारी श्रीमती जिता आणि पूर्व शहा यांनी विद्यार्थ्यांना शेअर बाजाराविषयी माहिती देताना एसआयपी, पोर्टफोलियो मॅनेजमेंट, गुंतवणूक, मिड कॅप आणि लार्ज कॅप शेअर याविषयी मार्गदर्शन केले. शेअर बाजार, कॅपिटल मार्केट, डेरिव्हेटीव्ह मार्केट आणि एनएसई अकॅडमी सर्टिफिकेशन इन फायनान्सियल मार्केट्स यावर मार्गदर्शन सत्र झाले. एकंदरीतच विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केट व गुंतवणूक जाणून घेण्यासाठी हा अतिशय वेगळा प्रात्यक्षिक अनुभव होता. या संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजची भूमिका आणि भारतीय शेअर बाजाराचे डिजिटल प्रशासन समजून घेण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी शेअर बाजार, एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स, आणि इतर सिक्युरिटीज इत्यादीबद्दल माहिती मिळवली.
 
“काही दिवसांपूर्वीच सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘एनएसई’चे व्यवस्थापकीय संचालक आशिष चव्हाण यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सूर्यदत्त संस्थेतील विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी एनएसईमध्ये येण्यास परवानगी दिली होती. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी वैश्विक विकास व त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अभ्यासण्याची गरज असते. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. ‘एनएसई’ने दिलेल्या या संधीबद्दल आभार मानतो,” असे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *