‘अनाथांची माय’ लेकरांना पोरकं करून गेली!

‘अनाथांची माय’ लेकरांना पोरकं करून गेली!

पुणे : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महिन्याभरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते सिंधुताईंना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.

सिंधुताई यांचे मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत, त्यांच्या जाण्याने हि अनाथ मुले पोरकी झाली आहेत, सिंधुताई या माई नावाने परिचित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *