चिपळूणच्या संगमेश्वरच्या शाश्वत विकासाचे नवे प्रवर्तक शेखर सर…

चिपळूणच्या संगमेश्वरच्या शाश्वत विकासाचे नवे प्रवर्तक शेखर सर…

चिपळूण: केंद्रबिंदू असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या प्रत्येकाला सदैव प्रेरणा देणारे शेखर सर संगमेश्वर-चिपळूण विधानसभेचे आमदार व्हावेत ही जनसामन्यांची इच्छा २०१९ साली झालेल्या निवडणुकीत पूर्ण झाली. राजकीय आडाखे बांधणाऱ्या अभ्यासकांना तोंडात बोटे घालायला लावणारा विजय मिळवल्यानंतर आता नव्या आव्हानांना सज्ज व्हावे लागणार या जाणीवेने त्यांनी कामाला सुरुवात केली. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचा विस्तार आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करून त्यांनी मतदारसंघ आमदार झाल्यानंतरही पिंजून काढला.

महाविकास आघाडी असो वा महायुती त्यांनी आपले नेते मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सक्षमपणे साथ दिली. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार म्हणून निवडून आल्याने मतदारसंघासोबतच संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवण्याचे, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे दायित्व त्यांच्यावर आले. आणि त्यांनी ते लीलया पेलले. इतकेच नव्हे लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे पालन करत मा. नारायणराव राणे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कोरोना महामारीत आपल्या शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे शेखर सर, अन्य शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी सातत्याने चर्चा करत होते. आवश्यक सहकार्य वेळेत पोचवण्याचा प्रयत्न करत होते. अनेक रुग्णांनाही त्यांचा आधार वाटू लागला होता. अर्थातच त्याचसाठी जनतेने अत्यंत विश्वासाने त्यांना आमदार म्हणून संसदेत पाठवले होते. त्यामुळे कर्तव्य आणि सेवा यांमध्ये केवळ आमदार शेखर निकम अग्रणी नव्हते तर संपूर्ण सह्याद्री परिवार मैदानात होता.
प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शेखर सर पूर्ण ताकदीनिशी उतरल्याने चिपळूणकरांचे मत सार्थकी लागले होते. राज्यभरातून आलेल्या मदतकार्याचे नियमन, नियोजन आणि गरजूंनाच लाभ मिळावा हा अट्टाहास केवळ कार्यालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष आपद्ग्रस्त ठिकाणी पावसात उभं राहून पूर्ण करणारे शेखर सर चिपळूणकरांनाच नव्हे तर संगमेश्वर भागातील सुदूर क्षेत्रातील ग्रामस्थांना भावले.
एका लेखातून आदरणीय शेखर सरांचे कार्य, कर्तृत्व आणि भावना व्यक्त करणे हा मागील ५ वर्षांच्या काळाचा, जनसेवेचा अपमान तर ठरेलच पण लेखक म्हणून माझ्याही तत्त्वांचा अनादर ठरेल. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या मतदारसंघाला आशेचा नवा किरण प्रदान करणाऱ्या शेखर सरांच्या कार्यावरील ही लेखमाला नक्की वाचा. इतरांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्या. आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. कदाचित त्यातूनही शेखर सरांचे नवे पैलू लोकांसमोर येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *