– ‘भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ विषयावर परिसंवाद; बाबा आढाव अध्यक्षस्थानी
– ॲड. जयदेव गायकवाड यांची माहिती; सत्यशोधक समाजाच्या १५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
पुणे, दि. २२ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते, समता समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक व ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षाखाली होणार आहे. हा उद्घाटन समारंभ येत्या बुधवारी (ता. २४) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे (The inauguration ceremony will be held under the chairmanship of senior thinker Baba Adhav. The inauguration ceremony will be held on Wednesday (24) at 5.30 pm at Balgandharva Rangmandir Pune. )येथे होणार आहे, अशी माहिती ॲड. जयदेव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सेंटरचे उपाध्यक्ष विजय जाधव, दत्तात्रय गायकवाड, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते.
(Ad. Jaidev gaikwad said)ॲड. जयदेव गायकवाड म्हणाले, “या उद्घाटन समारंभाचा एक भाग म्हणून भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. सुहास पळशीकर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस अॅड. शारदा वाडेकर यात सहभागी होणार आहेत.”
“बाबासाहेबांनी १९४६ ते १९४८ या तीन वर्षांच्या काळात आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता जे भारतीय संविधान निर्माण केले आणि या देशातील लोकशाहीला बळ देणारा सामाजिक न्यायाचा पाया रचला. त्या संविधानावर आज काही फॅसिझमवादी शक्ती आक्रमण करू लागल्या आहेत. आजचे हे वर्तमान लक्षात घेता या सोशल सेंटरच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर संविधान संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे,” असे अॅड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले.
“डॉ. आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हा एक प्रमुख उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी जो थिंकटॅक आम्ही उभा करीत आहोत. त्याचे मार्गदर्शन या उपक्रमात प्राधान्याने देण्यात येईल. यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे,” असे अरुण खोरे यांनी नमूद केले.
संविधानाची नैतिकता अधोरेखित करण्याचा आमच्या सामाजिक अभ्यास केंद्राचा प्रयत्न राहणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांशी समन्वय साधून अभ्यास प्रकल्पासंदर्भात चर्चा, संवाद करणे, यावर भर दिला जाणार आहे, असे विजय जाधव यांनी सांगितले.
रिसर्च सेंटरची वैशिष्ट्ये:
– डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार
– बाबासाहेबांच्या स्मरणार्थ समता व्याख्यानमाला
– आंबेडकर जयंतीनिमित्त अनियतकालिक सुरु करणे
– आंबेडकरांसंबंधी सुरु असलेल्या अभ्यास व संशोधनावर प्रकल्प निर्मिती
– चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण देणे
– आंबेडकरी विचारांचा थिंकटॅंक उभारणे
– विविध संस्था-संघटनांशी संपर्क आणि समन्वय
– विविध जाती-जमातीच्या समकालीन प्रश्नांवर संशोधन प्रकल्प राबवणे
