ज्येष्ठ पत्रकार, संपादक अशोक अग्रवाल यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, संपादक अशोक अग्रवाल यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, संपादक अशोक अग्रवाल यांचे निधन

दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन

पुणे, ता. ९ : ज्येष्ठ संपादक-पत्रकार, दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक काश्मिरीराल अग्रवाल यांचे सोमवारी पुण्यात अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अग्रवाल यांच्या निधनाने संपूर्ण अग्रवाल समाजासह पुण्यातील पत्रकार, राजकीय नेते, हितचिंतक आणि भारत डायरीच्या वाचकांना मोठा धक्का बसला आहे.

अशोक अग्रवाल यांच्या निधनाने हिंदी पत्रकारितेची मोठी हानी झाली असून, निःपक्षपाती, निर्भय आणि सचोटीवर आधारित पत्रकारिता ही त्यांची ओळख होती. अखेरच्या श्वासापर्यंत अशोक अग्रवाल यांनी श्रमिक पत्रकार प्रामाणिक आणि समर्पित भावनेने लढाऊ पत्रकारिता केली. त्यांचे योगदान केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण हिंदी पत्रकारिता जगतासाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या निधनाबद्दल पुणे आणि देशभरातील पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पत्रकारिता म्हणजे समाजाचा खरा आवाज आहे, या भूमिकेतून त्यांनी आयुष्यभर काम करत सत्य समोर आणण्यासाठी नेहमी निर्भयपणे काम केले.

दैनिक भारत डायरीच्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षीपासून अग्रवाल यांनी चित्रपट अभिनेते कादर खान यांच्या नावाने ‘सर कादर खान जीवनगौरव पुरस्कार’ सुरु केला होता. येत्या शनिवारी (ता. १४) टिळक स्मारक मंदिरात नियोजित कार्यक्रमात चित्रपट अभिनेते जितेंद्र कपूर हा पुरस्कार दिला जाणार होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुरस्कराचे वितरण होणार होते. मात्र, अग्रवाल यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

विशाल अग्रवाल सांभाळणार संपादकीय जबाबदारी

अशोक अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि उपसंपादक विशाल अशोक अग्रवाल हे संपादकाची तात्काळ जबाबदारी स्वीकारणार आहेत. विशाल अग्रवाल हे देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पत्रकारितेच्या सेवेत गुंतले असून या कठीण प्रसंगी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते तत्पर आहेत. अशोक अग्रवाल यांचे निधन हे हिंदी पत्रकारिता जगताचे मोठे नुकसान आहे, हे फार काळ विसरता येणार नाही. त्यांनी प्रस्थापित केलेली मूल्ये आणि मूल्यांवर आधारित पत्रकारिता पुढे नेण्याचे आव्हान आता त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि सहकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

दैनिक भारत डायरीची स्थापना आणि वारसा

अशोक अग्रवाल यांनी ८ ऑगस्ट १९९७ रोजी दैनिक भारत डायरीची स्थापना केली, जी आज पुण्यातील हिंदी पत्रकारितेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या वृत्तपत्राचा पहिला अंक दिवंगत चित्रपट अभिनेते कादर खान यांनी सुरू केला होता. तेव्हापासून आजतागायत दैनिक भारत डायरीने जनहिताची पत्रकारिता सर्वोच्च ठेवली आहे आणि समाजातील दुर्बल घटकांचा आवाज राहिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *