ॲनालिटिकल सायंटिस्टस् सोसायटीच्या उपाध्यक्षपदी शास्त्रज्ञ डॉ. निलीमा राजुरकर यांची बिनविरोध निवड

ॲनालिटिकल सायंटिस्टस् सोसायटीच्या उपाध्यक्षपदी शास्त्रज्ञ डॉ. निलीमा राजुरकर यांची बिनविरोध निवड

पुणे: इंडियन सोसायटी ऑफ ॲनालिटिकल सायंटिस्टस् (आयएसएएस) या शास्त्रीय संस्थेच्या कार्यकारी समितीवर पुण्यातील शास्त्रज्ञ डॉ. निलीमा राजुरकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या संस्थेचे तीन हजाराहून अधिक आजीव सदस्य असून, यामध्ये देशातील अनेक नामांकित संस्थांमधील शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या संस्थेचे भारतात दहा चॅप्टर्स आहेत. त्यातील पुणे चॅप्टरची स्थापना डॉ. राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली २०२१ मध्ये झाली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील  मूलभूत तसेच नाविन्यपूर्ण संशोधन  समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचणे हा असून, याअंतर्गत अनेक कार्यशाळा, सेमिनार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस, नामांकित शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. त्याबरोबरच क्वीझ कॉम्पिटिशन, ई-पोस्टर कॉम्पिटिशन, लेक्चर कॉम्पिटिशन असे अनेक विद्यार्थीभिमुख कार्यक्रम घेतले जातात. गेली सलग चार वर्षे पुणे चॅप्टरला ‘बेस्ट चॅप्टर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. राजुरकर या संस्थेच्या जर्नलच्या मुख्य संपादिका म्हणूनही कार्यरत आहेत.