भोसरी,, दि. २१ – संत निरंकारी मिशनच्या वतीने आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ (Sant Nirankari Mission celebrates ‘International Yoga Day’ today) मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी ६:३० ते ८:०० पर्यंत स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवन मध्ये साजरा करण्यात आला. या मध्ये २०० हुन अधिक साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या मध्ये भोसरी परिसरातील जिजामाता शाळेतील १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. योग प्रशिक्षक श्री. समुद्र सर यांनी योगांची विविध प्रात्यक्षिके करून घेतली. संत निरंकारी मिशनद्वारे भारतवर्षातील १००० पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी ‘योग दिवस’ (yog day) आयोजित केला गेला होता.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या निर्देशनामध्ये आध्यात्मिक जागरूकतेला अधिक महत्व देत असतानाच समाज कल्याण उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तिकरण, बाल विकास, युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक मार्गदर्शन देत अनेक परियोजना कार्यान्वित करुन संचलित केल्या जात आहेत. मिशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांबद्दल नेहमीच प्रशंसेस पात्र ठरलेले आहे. सद्गुरु माताजी म्हणतात आपल्या सर्वांमध्ये आध्यात्मिक जागृती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहू ज्यायोगे आपला सर्वांगिण विकास होऊ शकतो. याकरिता आपण स्वास्थ्य जागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे, जेणेकरुन आपण तना-मनाने स्वस्थ राहू शकू.
या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विषय – ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’ असा जाहीर केला आहे ज्यातून संपूर्ण मानवतेला हा संदेश मिळतो, की व्यक्तीचे वास्तविक स्वास्थ्य तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा ती शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक दृष्टीने संतुलित व जागरुक असेल. हाच उद्देश्य केंद्रीभूत मानून आपल्या आध्यात्मिक व सामाजिक प्रयत्नांच्या अंतर्गत योगाला समग्र कल्याणाचे माध्यम मानत निरंतर प्रयासरत आहे.