शिक्षक सक्षमीकरणासाठी ‘साधना फेलोशिप’ उपक्रम लीडरशिप फॉर इक्विटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व बजाज फिनसर्वचा संयुक्त उपक्रम

शिक्षक सक्षमीकरणासाठी ‘साधना फेलोशिप’ उपक्रम लीडरशिप फॉर इक्विटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व बजाज फिनसर्वचा संयुक्त उपक्रम

 
सिद्धेश शर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती; ३० सप्टेंबरपर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार
 
पुणे, दि.  ८ –  शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी पुण्यातील स्वयंसेवी संस्था ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ (एलएफई) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीआयएसएस) सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साधना फेलोशिप २०२५’ उपक्रम  (‘Sadhana Fellowship 2025’ initiative in collaboration with Leadership for Equity (LFE) and Tata Institute of Social Sciences (TISS) Centre of Excellence in Teacher Education and Bajaj Finserv) सुरू करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण उपक्रम येत्या सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून, शिक्षणात रुची असलेल्या युवकांना प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम शिक्षक घडवण्याचा उद्देश यामागे आहे, अशी माहिती ‘एलएफई’चे सहसंस्थापक सिद्धेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘एलएफई’च्या प्रकल्प व्यवस्थापक काजल पवार, अकॅडमिक लीडर शार्दुली जोशी आदी उपस्थित होते.
(Sidesh sharma said)सिद्देश शर्मा म्हणाले, “शिक्षणपदवीधारक बेरोजगार उमेदवार तसेच इतर क्षेत्रांतून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना ही नामी संधी उपलब्ध आहे. आठवड्यातून चार दिवस शाळांमध्ये ४०० तासांचे थेट अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यात विषयनिहाय अध्यापन, इंग्रजी संवादकौशल्य, डिजिटल साधनांचा वापर, मुलांशी संवाद आदी गोष्टींचा समावेश आहे. या फेलोशिपचा मुख्य गाभा ‘अनुभवातून शिका’ या संकल्पनेत आहे. प्रत्यक्ष वर्गखोल्यांमध्ये शिकवण्याचा अनुभव देत फेलोंना अनुभवी मार्गदर्शकांच्या सहाय्याने तयार केले जाणार आहे. फेलोशिपच्या कालावधीत दरमहा ५,००० रुपये मानधनही दिले जाईल. यशस्वी फेलोंना ‘टीआयएसएस’ आणि ‘एलएफई’ यांच्याकडून संयुक्त प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच ‘एलएफई’च्या नेटवर्कद्वारे रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”

(Kajal pawar said)काजल पवार म्हणाल्या, “सक्षम शिक्षक घडवणे म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी बीजारोपण करणे आहे. ‘साधना फेलोशिप’मुळे शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेले आत्मविश्वासी आणि सर्जनशील शिक्षक घडवता येतील. या फेलोशिपसाठी बजाज फायनसर्व्ह या प्रमुख उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे. शिक्षणातील दर्जा आणि समावेशकता वाढवण्याच्या दृष्टीने ‘साधना’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. ही फेलोशिप केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आहे. शिक्षक म्हणून प्रत्येक फेलोला एक प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात येथे करता येईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ असून, अधिक माहिती www.LeadershipForEquity.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.”

साधना फेलोशिप’ची वैशिष्ट्ये
– इंटर्नशिप व प्रतिमहिना ५००० रुपये मानधन
– हमखास नोकरी मिळण्याची हमी
– ‘टीआयएसएस’ आणि एलएफई’द्वारे प्रमाणपत्र
– तज्ज्ञ मार्गदर्शकांडून प्रोत्साहन व प्रशिक्षण
– ४०० तासांचे अनुभवाधारीत ज्ञान घेता येणार
– स्वतःमधील शिक्षक घडवण्याची संधी
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *