पुणे: चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनमध्ये (एसआयएमएमसी) एमबीएच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी रोहित राजेंद्र वाघ याची निवड झाली आहे. रोहित २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बालेवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत रोहितने चौथे स्थान मिळवले.
काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये (तामिळनाडू) आयोजित ३३ व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत ५० मीटर प्रकारात रोहितने कांस्यपदक पटकविले होते. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एनआरएआय) दिल्ली येथे डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजवर होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवराज ससे आणि सविता मताने यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित यशस्वी कामगिरी करत आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या वतीने रोहित वाघ याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
![]() |