डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे संस्मरणीय : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे संस्मरणीय : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार’
‘सूर्यदत्त’चे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना प्रदान
 
पुणे : स्वानंद महिला संस्था, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनला ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना गौरवण्यात आले. ‘सूर्यदत्त’सह दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन, जळगाव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा, आखिल भारतीय श्री वर्धमान जैन स्वाध्याय संघ, जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड, गौतम स्मृती फाउंडेशन पुणे, नक्षत्राचे देणेकाव्यमंच या संस्थांनाही गौरविण्यात आले.
 
ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्या अध्यक्षेतेखाली निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये नुकत्याच झालेल्या स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष आशा लुंकड, ‘स्वानंद’च्या संस्थापिका प्रा. सुरेखा कटारिया, अध्यक्षा शोभा बंब आदी उपस्थित होते. संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारीवाल, उद्योजक नेमीचंद चोपडा, उद्योजिका दिना धारीवाल, उद्योजिका आशा कटारिया, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रा. अशोक पगारिया, रमणलालजी लुंकड, अविनाशजी चोरडिया, भाऊसाहेब भोईर, प्रफुल्ल रायसोनी, राजेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार सूर्यदत्त संस्थेला मिळाला, ही बाब संस्मरणीय आहे.कलाम यांच्या उल्लेखनीय कार्याला अभिवादन म्हणून त्यांचे नाव संस्थेतील एका सभागृहास दिले आहे. रौप्य महोत्सव साजरा करत असलेल्या सूर्यदत्त संस्था सर्वांगीण विकास आणि सर्वांसाठी शिक्षण या ध्येयाने प्रेरितहोऊन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, कायदा, फार्मसी, फिजिओथेरपी अशा नवीन विद्याशाखा कार्यरत आहेत. आधुनिकतेसह परंपरागत ज्ञान शाखा, भारतीय नीतिमूल्ये, संस्कृती आणि उद्योग व्यवसायांशी संलग्न अशा पद्धतीच्या शिक्षणासाठी संस्था आग्रही आहे. संस्थेतर्फे स्त्री शक्ती पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार, महिलांसाठी शिवण यंत्र वितरण, मोफत आरोग्य शिबीर, दिव्यांगांसाठी मोफत कॅलिपर वितरण, दुर्गम भागातील विद्यार्थीनींसाठी सायकल वितरण असे अनेक उपक्रम राबविते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *