‘ममता दिन’ निमित्त माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन
मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कडून शुभेच्छा
पुणे, ६ जानेवारी: १९९५ ते ९९ चे शिवशाही सरकार आणि आताचे महाविकास आघाडी सरकार यांना हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आशिर्वाद लाभला आहे. मा.ना.उद्धव साहेबांवर संवेदनशील ,सुसंस्कृतेचे आणि अभ्यासाचे संस्कार झाले ते माँसाहेब मुळे झाले. त्याचबरोबर शिवसैनिक आणि महिला आघाडीला मायेची सावली देण्याचे काम जे माँसाहेबांनी केले तेच काम सौ.रश्मी वहिनी ठाकरे आता करत आहेत. अशा भावना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग पुणे येथे झालेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले; या प्रसंगी त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, युवासेनेचे सह सचिव किरण साळी, विभाग प्रमुख संदीप लोखंडे, शहर संघटीका सवीता मते, संगीत ठोसर, नगरसेविका पल्लवी जावळे, महिला पदाधिकारी सुदर्शना त्रिगुणाईत, शर्मिला येवले , अन्य महिला पदाधिकारी, युवा सैनिक, उपस्थित होते.
मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देखील डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी दिल्या.