कार्यवाह पदावर पांडुरंग सांडभोर आणि खजिनदार पदावर सुनीत भावे यांची निवड
पुणे, दि. १० – पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदावर दैनिक आज का आनंद चे शैलेश काळे यांची निवड (Shailesh Kale of Daily Aaj Ka Anand elected as President of Pune Journalists’ Association) करण्यात आली आहे. तसेच कार्यवाह पदावर दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर आणि खजिनदार पदावर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सुनीत भावे यांची सोमवारी (दि.८ सप्टेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी (दि.२२ ऑगस्ट) निवडणूक झाली. ॲड. प्रताप परदेशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विश्वस्तांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात) आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील (सकाळ) यांची पदसिद्ध विश्वस्तपदी याआधीच निवड झाली आहे. नवीन विश्वस्तांची पदाधिकारी निवडीची सभा सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) मावळते अध्यक्ष शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नवीन पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मावळते कार्यवाह डॉ. गजेंद्र बडे उपस्थित होते.