पुणे, दि. ९ – – भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा १५० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथे ‘पुणे रन फॉर युनिटी’, महामॅरेथॉनचे आयोजन (‘Pune Run for Unity’, a mega marathon organized ) केले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रसंगी विशाल सातव, मनोज एरंडे, अमोल कविटकर, रमेश परदेशी, योगेश यावलकर, अरविंद बिजवे आदी उपस्थित होते.
यावर्षीच्या ‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे २०,००० धावपटू सहभागी होणार (Approximately 20,000 runners, including international athletes, will participate in this year’s ‘Pune Run for Unity’) आहेत. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंना आमंत्रित केले आहे व त्यातील काही धावपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. तसेच भारत देशातील नामांकित राष्ट्रीय धावपटूंना देखील आमंत्रित केले आहे. विजेत्यांसाठी एकूण १० लाखांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. २१ कि.मी. श्रेणीत विजेत्या पुरुष व महिला खेळाडूंना प्रथम परितोषिक प्रत्येकी १,००,००० देण्यात येणार आहे.
पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या ध्येयाला प्रत्यक्ष हातभार लावावा, तसेच सहभाग व नोंदणीसाठी सोबत दिलेल्या क्यूआर कोडचा उपयोग करावा, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
* २१ कि.मी.- हाफ मॅरेथॉन (टायमिंग चिपसह)
* १० कि.मी.- स्पर्धात्मक धाव (टायमिंग चिपसह)
* ५ कि.मी.– फन रन
* ३ कि.मी.– फॅमिली व बिगिनर रन
स. प. महाविद्यालय येथून निघणारी २१ किमी मॅरेथॉन टिळक रोड, अलका चौक, फर्ग्युसन रोड, विद्यापीठ चौक मार्गे पाषाण, बावधनमार्गे पुन्हा विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, भांडारकर रोडमार्गे अलका चौकातून पुन्हा स. प. महाविद्यालय येथे समारोप होईल.