लंडन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’च्या सदस्यपदी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

लंडन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’च्या सदस्यपदी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

लंडन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’च्या सदस्यपदी
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

पुणे : लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (आयओडी) या संस्थेच्या सदस्यपदी पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. ‘आयओडी’ ही युनायटेड किंग्डमसह जगभरातील कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना आहे. या संघटनेशी जगभरातील ३० हजाराहून अधिक मंडळ सदस्य जोडलेले असून, भारत, दुबई, सिंगापूर आणि लंडन अशा ठिकाणी वार्षिक परिषदांमधून सदस्य मंडळासंबंधित विविध विषय आणि प्रश्नांवर चर्चा होते.

गेल्या ३० वर्षांपासून नेतृत्व, कौशल्य व क्षमता विकास यासाठी ही संघटना सदस्य मंडळ समुदायाला सेवा देते. ग्लोबल बिझनेस मीट आयोजित करून जगभरातील उद्योजक, धोरणकर्ते आणि सदस्य मंडळाला एकत्रित आणले जाते. या मंडळ सदस्यांमध्ये वैविध्यता असून, त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, बँकर, सल्लागार, शिक्षणतज्ज्ञ आदींचा समावेश आहे. त्यामुळे नेटवर्किंग आणि व्यवसाय वृद्धी व विस्ताराची संधी एकाच छताखाली उपलब्ध होते.

दरवर्षी भारतातील किंवा परदेशातील मान्यवर व्यक्तींना ‘आयओडी डिस्टिंग्विश्ड फेलो’ म्हणून सन्मानित करण्यात येते. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा व्यापक आणि वैविध्यपूर्ण अनुभव लक्षात घेऊन, त्यांना संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॉ. संजय बी. चोरडिया हे आयओडी इंडियाचे फेलो सदस्य आहेत. या नियुक्तीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संचालक, व्यावसायिक, धोरण निर्माते इत्यादींसह चांगल्या नेटवर्किंगची संधी देते. या सदस्यत्वामुळे व्यवसाय सल्ला प्रकल्प, इंटर्नशिप्स आणि इतर उपक्रमांतून सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना भारतातील आणि परदेशातील कंपन्यांशी जोडण्यास मदत होणार आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले उत्साही शिक्षणतज्ज्ञ, ग्लोबल कोच, उद्योग आणि व्यवस्थापन व्यावसायिक, दूरदर्शी आणि सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्ता शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनासह एक परोपकारी व्यक्तिमत्व आहेत. त्यांना वरिष्ठ व्यवस्थापन पदावर फोर्स मोटर्स लिमिटेडसह आघाडीच्या ऑटोमोबाईल उद्योगातील ४० वर्षांचा आणि शिक्षण, सीएसआर, सार्वजनिक सेवा, कॉर्पोरेट गव्हर्नन्स इत्यादी क्षेत्रातील २८ वर्षांपेक्षा अधिक प्रदीर्घ अनुभव आहे. केंद्र सरकारच्या कच्चा माल संचालन समिती, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, टेलिफोन सल्लागार मंडळ इत्यादी अनेक संस्थांमध्ये सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, एआयएमए, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ प्रोडक्शन इंजिनियर्सचे फेलो सदस्य, तसेच विविध संस्थांचे पॅट्रॉन सदस्य / आजीवन सदस्य आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य आहेत आणि अमेरिकेतील ग्लोबल चेंबरच्या इन्स्टिट्यूट इंडस्ट्री पार्टनरशिपचे अध्यक्ष आहेत. डॉ. चोरडिया यांच्या नावावर १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून, त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नियुक्तीबद्दल सूर्यदत्त परिवाराच्या त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ‘ही नियुक्ती सूर्यदत्त संस्थेला आणखी चांगले काम विस्ताराने करण्याची संधी देईल. तसेच आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जोडण्यासाठी याचा उपयोग होईल. सर्वांसाठी सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे काम यापुढेही आणखी जोमाने करणार असल्याची भावना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *