प्रतिक गंगणे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

प्रतिक गंगणे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

पुणे : सामाजिक भान जपत सातत्याने पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार प्रतिक गंगणे यांना संध्या परिवाराच्या वतीने ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि माजी महापौर तथा नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी ज्योती नाळे उपस्थित होत्या.

तृप्ती देसाई यांनी सांगितले की, “पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. प्रतिक गंगणे यांनी निर्भीड आणि जबाबदार पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला असून, समाजातील वंचित आणि सामान्य लोकांचे प्रश्न सातत्याने मांडण्याचे काम त्यांनी केले आहे.”

प्रशांत जगताप यांनीही गंगणे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “सकारात्मक पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचे काम करते. गंगणे यांनी विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे.”

प्रतिक गंगणे यांनी कृतज्ञतापूर्वक हा पुरस्कार स्वीकार करत असल्याचे सांगत ‘हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, यापुढेही सातत्याने समाजातील प्रश्न मांडत जनतेचा आवाज होण्याचा प्रयत्न राहील.”