डॉ. धनंजय आबनावे हे मूळचे फुरसुंगी गावचे असून, सध्या ते नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे लेखाधिकारी पदावर कार्यरत आहेत. डॉ. धनंजय आबनावे यांचे एमकॉम, बीएड, एमए (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, शिक्षणशास्त्र, लोकप्रशासन), सेट-नेट (वाणिज्य, अर्थशास, शिक्षणशास्त्र), सेट (राज्यशास्त्र), नेट (इतिहास), डीएसएम, जीडीसीए अशा एकूण १८ पदव्या आणि आता पीएचडी इतके शिक्षण झाले आहे. खडतर परिस्थितीतून डॉ. आबनावे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे फुरसुंगी पंचक्रोशीमधून, त्यांच्या मित्रपरिवाराकडून, नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.
यावर बोलताना डॉ. धनंजय आबनावे म्हणाले, “माझ्या आईवडिलांनी केलेल्या मेहनतीमुळे व दिलेल्या संस्कारांमुळे आज इथपर्यंत पोहचलो आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून शिक्षण घेत गेलो. शिक्षण हेच प्रगतीचे व प्रबोधनाचे साधन असून प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे.”