भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

 

पिंपरी दि.२७ – भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू  (pandit Nehru )यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार,मुख्य लिपिक संदीप गव्हाणे, अभिजित डोळस तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

नेहरूनगर,पिंपरी येथील भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माजी नगरसदस्य राहुल भोसले,सामाजिक कार्यकर्ते संजय धाडगे,अनिल यादव,जयराज जोशी,रामा नलावडे,रविकांत पवार,उत्तम जोगदंड तसेच नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *