पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महान खगोल शास्त्रज्ञ स्व. पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन पिंपरी चिंचवड तारांगण सभागृहात करण्यात आले.
या सभेस पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, ऑटोक्लस्टरचे एम.डी. किरण वैद्य, लघुउद्योग संघटना पिंपरी चिंचवडचे जयंत कड, पिंपरी चिंचवड सोशल फाऊंडेशनचे जवाहर कोटवानी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपारिया आदी उपस्थित होते. डॉ. जयंत नारळीकर यांचे तारांगण उभारणीमध्ये मार्गदर्शक म्हणून मोठे सहकार्य व बहूमोल योगदान लाभले आहे. त्याप्रती सर्व उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नारळीकर यांचे विज्ञान प्रसारासाठी असलेले बहुमूल्य योगदेन आणि खगोल शास्त्रातील त्यांनी केलेले संशोधन यासाठी श्री. नारळीकर सदैव स्मरणात राहतील, असे मत प्रवीण तुपे यांनी व्यक्त केले.