पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

 

पिंपरी, दि. २-  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भटक्या विमुक्त समाजाचे स्वातंत्र्याच्या चळवळीतील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” , (“Wanderers Liberation Day” ) म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक निर्गमित केलेले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह (comishnior shekhar shinh) यांचे निर्देशानुसार तसेच उप आयुक्त आण्णा बोदडे (अण्णा bodhde) यांच्या मार्गदर्शनाखाली “भटके विमुक्त दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.

भाटनगर,पिंपरी येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी शिक्षण व इतर योजनांची माहिती जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना दिली. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी व बांधवांनी घ्यावा असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी माजी महापौर कविचंद भाट,सामाजिक कार्यकर्ते मनोज माछरे, विकी तामचीकर, सुभाष माछरे,भुपेंद्र तामचीकर,अभय भाट, सनी मलके, राज माछरे, नरेंद्र तामचीकर, अक्षय माछरे तसेच शालेय विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.भाटनगर येथील कार्यक्रमात भटके विमुक्त समाजाच्या संस्कृती, जीवनपद्धती आणि संघर्षाबाबत माहिती देण्यात आली तसेच जात प्रमाणपत्र,आधार कार्ड यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *