पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा

 

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपरी दि. १५ – भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ७८ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.  (The 78th anniversary of India’s Independence Day was celebrated with enthusiasm by the Pimpri Chinchwad Municipal Corporation.) यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी उपस्थितांना आयुक्त शेखर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.

आयुक्त सिंह म्हणाले,’भारतीय स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा उत्सव आपण घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून आनंदाने साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या देशाच्या इतिहासाची सुवर्ण पाने आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. सर्वप्रथम मी सर्व शहरवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.’

‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिका कटिबद्ध आहे. स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ई-प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांमुळे आपले शहर देशभरात वेगळा ठसा उमटवत आहे. आगामी काळात देशाच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचे मोठे योगदान असेल, असा मला दृढ विश्वास आहे,’ असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, ,माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे,नामदेव ढाके, जितेंद्र ननावरे,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर,शहर अभियंता मकरंद निकम,मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले,सह आयुक्त मनोज लोणकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे, डाॅ.अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड,देवन्ना गट्टूवार,अनिल भालसाखळे,उप आयुक्त राजेश आगळे,अण्णा बोदडे, पंकज पाटील, प्रदीप ठेंगल,ममता शिंदे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागातील अधिकारी,आपदा मित्र प्रमुख संतोष शेलार आणि ३० आपदा सहकारी,विविध विभागांचे प्रमुख,सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *