एप्रिल २०२५ अखेर महापालिका सेवेतून विविध अधिकारी, कर्मचारी असे २४ जण सेवानिवृत्त

एप्रिल २०२५ अखेर महापालिका सेवेतून विविध अधिकारी, कर्मचारी असे २४ जण सेवानिवृत्त

 

पिंपरी, दि. ३० –  सेवानिवृत्तीनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निरोगी आणि आनंददायी जीवन जगावे तसेच आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा. याशिवाय नोकरीदरम्यान राहून गेलेले पर्यटन,आवडते छंद जोपासावेत असे मत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी व्यक्त केले आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे माहे एप्रिल २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १४ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण २४ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, लेखाधिकारी चारूशिला जोशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लघुलेखक सुनीता पळसकर, सुनीता कामथे, उप लेखापाल माया गीते ,नयना दिक्षित, मुख्य लिपिक माया वाकडे, अनिता चेमटे, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे तसेच कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, बालाजी अय्यंगार, नंदकुमार इंदलकर आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे एप्रिल २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी श्रद्धा बोरडे, मुख्याध्यापक सुनंदा मगर, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक सुजाता भोसले, लेखापाल मधुकर सानप, सिस्टर इनचार्ज अनिता आगवणे, उपशिक्षक संजिवनी राऊत, स्टाफ नर्स माधुरी यादव, रखवालदार अनिल घाडगे, शिपाई रफिक सुतार, मजूर गोवर्धन दखनेजा, सुनील काळे, किरण जगदाळे, सफाई कामगार मंदा जाधव, सफाई सेवक शांताराम मेंगळे यांचा समावेश आहे.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये स्टाफ नर्स मिनाक्षी आढाव, सफाई कामगार पारूबाई काळोखे, मिना जाधव, चंद्रकांत जगताप, संगिता कांबळे, सफाई सेवक लख्खन पुनमचंद, जयप्रकाश जाधव, तानाजी सनके, गटरकुली जंगल गोठे, सफाई कामगार दत्तात्रय हाटकर यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *