सीए दुर्गेश काबरा यांचे मत; सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार

सीए दुर्गेश काबरा यांचे मत; सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार

काळानुरूप नवे बदल, नवतंत्रज्ञात आत्मसात करावेत
सीए दुर्गेश काबरा यांचे मत;
सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वीतांचा व्हीस्मार्ट अकॅडमीतर्फे सत्कार
 
पुणे : “काळ बदलतो, तसे नवे नियम, तंत्रज्ञान, कार्यपद्धती आदी गोष्टींमध्ये बदल होत असतात. बदल ही चिरंतर प्रक्रिया असून, बदलांना स्वीकारले नाही, तर आपण कालबाह्य होतो. त्यामुळे काळानुरूप आपणही नवे बदल, नवतंत्रज्ञात आत्मसात करत स्वतःला ‘अपडेट’ व ‘अपग्रेड’ करत राहायला हवे,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए दुर्गेश काबरा यांनी केले.
 
नुकत्याच झालेल्या सनदी लेखापाल (सीए) इंटरमिजिएट व फायनल परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या यशस्वीतांचा पुण्यातील व्हीस्मार्ट अकॅडमीतर्फे सत्कार सोहळा आयोजिला होता. कोथरूड येथील एमआयटीच्या विवेकानंद सभागृहात झालेल्या सोहळ्यावेळी व्हीस्मार्ट अकॅडमीचे संस्थापक सीए विशाल भट्टड, संस्थापक संचालक राजेश राकेश यांच्यासह सीए उज्ज्वल भट्टड, सीए जय चावला, सीए रवी टावरी आदी उपस्थित होते. 
 
सीए दुर्गेश काबरा म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी सारखे तंत्रज्ञान आयसीएआय वापरत आहे. एआय-आयसीएआय व सीए-जीपीटी याचा विद्यार्थ्यांना व सनदी लेखापालांना लाभ होत आहे. सीए निकाल, सदस्यत्व व इतर प्रक्रिया अधिक सुलभ झाल्या आहेत. नियोजनबद्ध अभ्यास, नियमित सराव, स्वयंअध्ययन आणि बदलत्या गोष्टींबाबत स्वतःला ‘अपडेट’ ठेवल्यानेच कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल परीक्षेत यश संपादन करता येते. यशस्वी झालेल्या सनदी लेखापालांचा सन्मान करून सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा सोहळा आहे.”
 
सीए विशाल भट्टड म्हणाले, “सीए परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांकडून प्रेरणा मिळावी. त्यांच्या यशाचा मार्ग समजावा, या उद्देशाने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. योग्य मार्गदर्शन, अभ्यासाच्या पद्धती व्हीस्मार्ट पुरवते. ‘व्हीस्मार्ट’च्या माध्यमातून देशात ८० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम केला, ही अभिमानाची बाब आहे.”
 
सीए अमोल जैन, सौ. स्नेहल टावरी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *