पुणे : नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे येत्या रविवारी (दि. ५ मे २०२४) सकाळी ९ ते ११ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे जागतिक हास्यदिन साजरा करण्यात येणार आहे. मे महिन्यातील पहिला रविवार ११० देशात जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमात सुरुवातीला हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे, तसेच संयोजक मकरंद टिल्लू यांच्या मार्गदर्शनात हास्य प्रात्यक्षिके होणार आहेत. त्यानंतर स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या कलाकारांबरोबर मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे व कलाकार सहभागी होणार आहेत.
डॉ. निखिल हृषिकेशी, महा एंजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा, संवाद पुढे संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मकरंद केळकर, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका आदी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विठ्ठल काटे व मकरंद टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पोपटलाल सिंघवी, विजय भोसले, प्रमोद ढेपे, जयंत दशपुत्रे आदी उपस्थित होते.