नो हॉंकींग डे ला हॉर्न एक दिवस बंद ठेऊया

नो हॉंकींग डे ला हॉर्न एक दिवस बंद ठेऊया

लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने मंगळवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी जनजागृतीचे आयोजन

पुणे : लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने पुण्यामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून मंगळवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकात नो हाँकीग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा.पद्माकर पुंडे आदी उपस्थित होते.

मंगळवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून त्यामध्ये मॉडर्न कॉलेजमधील एनएसएस चे विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेजमध्ये मुख्य कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र झुंजारराव, पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.पद्माकर पुंडे करणार आहेत. उपक्रमाचे यंदा ५ वे वर्ष आहे.

देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यातल्या विविध आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याउपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. पुण्यात साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मकरंद टिल्लू म्हणाले, सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्न चा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर हा नो हाँकींग डे पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *