पुणे शहरातील प्रसिद्ध आणि विश्वासू निओ मेगा स्टीलने आता बारामतीतील स्टीलची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बारामतीमध्ये आपली शाखा सुरू केली आहे. निओ मेगा स्टीलचे संचालक वेदांत गोयल यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या विस्तार धोरणानुसार, निओ मेगा स्टील महाराष्ट्र सहित मध्य, पश्चिम आणि दक्षिणेलील राज्यांमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहे. बारामतीमध्ये निओ मेगा स्टीलची शाखा सुरू करण्याचा एकमेव उद्देश दौंड, कुरकुंभ, सणसवाडी, रांजणगाव यासह जवळपासच्या एमआयडीसीला कंपनीचा फायदा मिळावा हा होता. परवडणार्या किमतीत सर्वोत्तम दर्जाचे स्टील उपलब्ध करून देण्यासाठी निओ मेगा स्टील हे आज एक विश्वासार्ह नाव बनले आहे.
आपल्या विस्ताराबाबत बोलताना गोयल पुढे म्हणाले की, देशभरात स्टीलची सर्वाधिक मागणी गृह, बांधकाम, वेअरहाउस, मॉल, शाळा-कॉलेज, कारखाने, रुग्णालय, टॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस , फर्निचर, व्यावसयांसाठीचे बांधकाम, कृषी, इक्विपमेंट्स,, इंडस्ट्रियल इक्विपमेंट मध्ये आहेत. लवकरच निओ पुणे तसेच मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, धुलिया, अहमदनगर, अकोला, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या शहरांमध्ये आपला विस्तार करेल. गोयल म्हणाले की, निओ मेगा स्टील व्यवसायासोबतच सीएसआर अंतर्गत सामाजिक कार्यही करत आहे . पाणी वाचवण्यासाठी आणि गरजूंना शैक्षणिक मदत करण्यासाठी विविध संस्थांसोबत ते काम करत आहे.
स्टील इंडस्ट्री विषयी माहिती देताना वेदांत गोयल म्हणाले की, निर्माण क्षेत्रातील पायाभुत सुविधा आणि रिअल इस्टेट या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असलेल्या बांधकाम क्षेत्राचा एकूण मागणीत सुमारे 62 टक्के वाटा आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राचे योगदान 9 टक्के आहे, 2019 मध्ये तयार स्टीलचा वापर 10.26 दशलक्ष टन होता. 2020 मध्ये, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे 20 टक्के विक्री कमी झाली होती, वाढती मागणी लक्षात घेता, मला विश्वास आहे की आता 10 दशलक्ष टनांची मागणी होईल.देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर नेण्यासाठी पोलाद क्षेत्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारताला स्टील निर्यात करणारा एक प्रमुख देश बनवण्यासाठी सरकार आज प्रयत्न करत आहे.निओ मेगा स्टील ही गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि आसपासची सर्वात मोठी स्टील पुरवठादार आहे. बारामतीमध्ये निओ मेगा स्टील शाखा सुरू केल्यानंतर, त्यांचे आता संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. मागणी असणार्या क्षेत्रात स्टील सहज उपलब्ध करून देणे निओचे उद्दिष्ट आहे. ते एपीएल अपोलो आणि इतर कंपन्यांचे प्रमुख स्टील सप्लायर्स आहेत. तसेच ते एमएस पाईप्स, स्ट्रक्चरल स्टील, एमएस प्लेट्सचे मुख्य सप्लायर्स आहेत.
महाराष्ट्रातील पुणे स्थित, निओ मेगा स्टील आज लोह आणि स्टील स्ट्रक्चरल आणि इंफ्रास्ट्रक्चर उत्पादनांमध्ये सर्वोत्तम म्हणुन ओळखली जाते. त्यांच्या व्हरायटीज मध्ये माइल्ड स्टील चैनल, गैल्वेनाइज्ड आयरन स्क्वेअर पाईप, माइल्ड स्टील 1 बीम, माइल्ड स्टील सीमलेस पाइपचा समावेश आहे. या सर्व वस्तू त्या सुप्रसिद्ध कंपन्यांनी उत्पादित केल्या ज्या निओशी जोडलेल्या आहेत. विश्वासू विक्रेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे, आज ते ग्राहकांना अतुलनीय समाधान प्रदान करण्यास सक्षम आहेत. त्यांच्या व्यवसायाला आज मार्केटमध्ये आघाडीचा व्यवसाय म्हणुन ओळखले जाते. आघाडिच्या किंमतीच्या, दर्जेदार उत्पादनांपैकी एक म्हणून निओकडे पाहिले जाते. निओ मेगा स्टील पुरवठा साखळीतील सर्व घटकांसोबत सातत्याने सहभागावर विश्वास ठेवते, कंपनीच्या टीमचा अनेक दशकांचा अनुभव, योग्य निर्णय त्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. शॉपिंग कार्ट सप्लायमध्ये वैविध्यपूर्ण उत्पादनासाठी सक्षम, मल्टी लोकेशन सप्लाय, लॉजिस्टिक सपोर्ट, उत्पादनात सतत वाढ, उत्पादनांचा पुरवठा करण्यास सक्षम नामांकित उद्योग निर्मात्यांसह सहयोग, योग्य निर्णय घेण्यासाठी शेअर मार्केट इंटेलिजन्स, चांगली किंमत ह्या त्यांच्या काही विशेषता आहेत.