पुणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका आणि कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. या संदर्भात राज्यासह पुण्यात नव्याने निर्बंध लागु करण्यात आले असून या नवीन नियमांना पुणेकरांनकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नव्या नियमानुसार राज्यातील मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद राहणार. रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार,सलून ५०% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी
रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी लागू राहणार आहे.शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी दोन डोस घेतलेले बंधनकारक केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आखलेल्या सर्व नियमांची कठोर अंबलबजावणी होण्यासाठी प्रशासन कठोर भुमिका घेत आहे हे कोरोना रोखण्यासाठी गरजेचे आहे अशी भावना काही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.