मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

सहभागासाठी असलेली अंतिम मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवली

पिंपरी, दि. ८-  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छतेचा नवा चेहरा‘ शोधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेला (Mascot design competition)      भरभरून प्रतिसाद मिळत आहे. डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिकविद्यार्थी आणि नागरिक यांच्यातून मिळणारा वाढता सहभाग लक्षात घेताया स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आता १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावेअसे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह  (Commissioner and Administrator Shekhar Singh)  यांनी केले आहे.

 स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पिंपरी चिंचवड शहराने आता राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दिशेने पाऊल टाकताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात स्वच्छतेविषयक विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यादृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ ची जोरदार तयारी सुरू असूननागरिकांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

 परी चिंचवड शहरातील सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असूनस्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. तसेच निवडलेला मॅस्कॉट महापालिकेच्या अधिकृत उपक्रमांमध्ये शहराचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असूनजास्तीत जास्त नागरिकांना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

स्पर्धेची नियमावली

  • एक व्यक्ती फक्त एकच डिझाईन पाठवू शकतो.
  • डिझाईन पूर्णतः स्वयंनिर्मित असावे.
  • मॅस्कॉटमध्ये स्वच्छताआरोग्यजबाबदारीनागरिक सहभागप्लास्टिकमुक्तीकचरा विलगीकरण यांसारख्या संकल्पनांचा समावेश असावा.
  • डिझाईन प्रेरणादायीस्थानिक संस्कृतीशी सुसंगत असावे.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

 स्पर्धेत असा घेता येईल सहभाग

  • नागरिकांनी स्पर्धेसाठी महापालिकेच्या दिलेल्या https://forms.gle/K7L2hN6eS4V3LYto6 या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
  • अर्जात आपले नावपत्ताई-मेलमोबाईल क्रमांक नमूद करून डिझाईन अपलोड करावे.
  • डिझाईन मागील संकल्पना थोडक्यात लिहून आपला अर्ज सादर करावा.

मॅस्कॉट डिझाईन ही केवळ एक स्पर्धा नाहीतर ती शहराच्या स्वच्छतेमध्ये लोकसहभाग वाढवण्याचं प्रभावी माध्यम आहे. पिंपरी चिंचवडकरांची सृजनशीलता आता शहराच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा.

— विजयकुमार खोराटेअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

स्वच्छतेच्या वाटचालीत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. मॅस्कॉट डिझाईन स्पर्धा म्हणजे आपल्या कल्पकतेद्वारे शहरासाठी योगदान देण्याची अनोखी संधी आहे. त्यानुषंगाने नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचा कालावधी देखील वाढविण्यात आला आहे.

— सचिन पवारउपायुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *