मयूर भोंगळे हे गेली २० वर्षे मानव संसाधन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी अनेक संस्थांमध्ये प्रभावी व्यवस्थापन, धोरणात्मक योजना आणि कर्मचारी विकासाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडले आहे. त्यांच्या कार्याचा परिणाम उद्योगक्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरला आहे. कार्यक्रमास प्रिन्स लर्निंग सेंटर, मलेशियाचे संचालक डाॅ. नासीर अफिजादीन आणि ज्येष्ठ प्राध्यापक डाॅ. राकेश मित्तल मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
(Mayur bhongale)मयूर भोंगळे यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे आईवडिल जयश्री व भीमराज बयाजी भोंगळे, पत्नी पूजा व मुलगा अथर्व यांना देत, त्यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार हे केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, संपूर्ण मानव संसाधन क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे.