भोसरी, दि. १०- नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी पुणे आयोजित शनिवार दि. १७ मे रविवारी १८ मे २०२५ रोजी पुणे येथे होणार्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५ चे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना महाकाव्यसंमेलन सस्नेह निमंत्रण पत्रिका देण्यात आली .त्यांना आमंत्रित करताना नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे (वादळकार), सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, आमदार श्री. तुकाराम काते, सचिव सौ. प्रीती सोनवणे व डॉ.अलका नाईक,संदीप लिंगायत, जगदीश लाड, अनिल जाधव इ.उपस्थित होते.
महासंमेलनाचे उद्घाटक उदय सामंत यांच्या शुभहस्ते एक्सप्रेस टॉवर ,नरिमन पॉईंट ,मुंबई या ठिकाणी आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
या महाकाव्यसंमेलनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले.त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे .अशी या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिली.
नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय ,भोसरी, पुणे च्या वतीने हे ‘आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५’चे नियोजन निळू फुले नाट्यगृह ,पिंपळे गुरव ,पुणे येथे दोन दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये काव्य ग्रंथ दिंडी, एकाच वेळी एकाच कवीचे दहा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येऊन विक्रम करण्यात येणार आहे, यावेळी आठवे महाकाव्य संमेलन असल्यामुळे आठ पुस्तकांचे प्रकाशन, आठ काव्य मैफल आणि तीन परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या सहभागी होणाऱ्या प्रत्येक कवीला सहभाग विनामूल्य व चहा, नाष्टा, निवास ,भोजन याची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक कवीला सहभागाबद्दल आकर्षक फोर कलर सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
या दोन दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी व संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशेच्या वर कवी उपस्थित राहत आहेत. तरी पिंपरी चिंचवड शहराच्या कवितेच्या राजधानीत हा भव्य सोहळा संपन्न होत आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून, हा सोहळा यशस्वी करावा. असे आवाहान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेले पंचवीस वर्ष शहरांमध्ये सांस्कृतिक साहित्यिक ,काव्य क्षेत्रातील अनेक उपक्रम राबवणारी ही अग्रणी संस्था आहे. कवींना लिहिते ,बोलते करणारं हे व्यासपीठ आहे. यांना आदर सन्मान मिळावा. म्हणून गेले पंचवीस वर्षे संस्था महाराष्ट्रभर काम करत आहे.
या महाकाव्यसंमेलनामध्ये महाकाव्यसंमेलन अध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण हे उपस्थित राहत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहत आहे. तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष युवा आमदार शंकरभाऊ जगताप, प्रमुख पाहुणे कृष्णकुमार गोयल, तसेच दुसऱ्या दिवसाच्या सत्राचे उद्घाटक माजी आमदार अश्विनी जगताप या सुद्धा उपस्थित राहत आहे.
तसेच अनेक नामवंत राजकीय , शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर अनेक पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. हा शहरासाठी अत्यंत आनंद देणारा सोहळा आहे.